मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना मुंबई सत्र न्यायालयाकडून कोर्टात हजर राहण्याची नोटीस पाठविली आहे. गोरेगाव पत्राचाळ घोटाळा प्रकरणी त्यांना मध्यंतरी अटक करण्यात आली होती. ते सध्या जामीनावर बाहेर असून त्यांना पुन्हा कोर्टात हजर राहण्याची नोटीस पाठवण्यात आली आहे. यातच मागे देखील त्यांना अशी नोटीस पाठवण्यात आली होती.
निवडणुक आयोगासमोर ठाकरे अन् शिंदे गटाच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद , निर्णय काय?
गोरेगाव पत्राचाळ घोटाळा प्रकरणात संजय राऊत यांच्याविरोधात आरोपनिश्चितीची प्रक्रिया २४ जानेवारीला सुरू होणार आहे. राऊत यांच्यासह सहआरोपी प्रवीण राऊत, वाधवान बंधू यांच्याविरोधात आरोपनिश्चितीची प्रक्रियाही सुरू होणार असून संजय राऊतांसोबत या प्रकरणातील सर्व आरोपींना कोर्टात हजर राहण्याची नोटीस मुंबई सत्र न्यायालयाकडून देण्यात आली आहे.
गोरेगाव पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊतांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना या प्रकरणी मध्यंतरी अटक करून जवळपास १०० दिवस त्यांना तुरूंगात डांबण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला. तर संजय राऊतांच्या जामीनावर इडीने आक्षेप घेतला होता. यावरून न्या. एन. आर. बोरकर यांच्या एकलपीठाने ईडीच्या याचिकेवरील सुनावणी ३ फेब्रूवारीपर्यंत पुढे ढकलली आहे.
Read also
- देवेंद्र फडणवीस धनंजय मुंडेंच्या भेटीला, फडणवीसांकडून मुंडेंच्या प्रकृतीची विचारपुस
- “सत्ताधारी आमचे शत्रू नाही..!”पार्थ पवार-शंभुराज देसाईंच्या भेटीवर अजित पवारांची प्रतिक्रिया
- पुण्यात भाजपचं ‘ऑपरेशन कमळ’ फुलणार..! काॅंग्रेस अन् राष्ट्रवादीचे 30 माजी नगरसेवक भाजपच्या वाटेवर
- बाळासाहेबाच्या तैलचित्राचं अनावरण विधानसभेत, ठाकरे अन् शिंदे आमनेसामने येणार का ?
- “आमदार थोरात हे भाची समजून आपल्या मागे उभे राहतील”; शुंभागी पाटलांचा विश्वास, काल गेटवरूनच परतल्या