मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या रोजगार मेळाव्यात आज मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या उपस्थितीत प्रातिनिधिक स्वरूपात उमेदवारांना शासकीय सेवेत नियुक्ती पत्रे देण्यात आली. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त राज्य सरकार 75,000 रोजगार देत आहे, त्याचा हा शुभारंभ! या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मंत्री मंगलप्रभात लोढा, रवींद्र चव्हाण, उदय सामंत, अब्दुल सत्तार, शंभुराजे देसाई आदी यावेळी उपस्थित होते.
तू लाव टिकली, परंपरेच्या बाजारात अक्कल आम्ही विकली; सुळेंचा भिडेंना खोचक टोला
हा स्वप्नांच्या पूर्ततेचा प्रारंभ आहे. आज प्रातिनिधिक स्वरूपात 2000 नियुक्ती पत्रे देण्यात येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 10 लाख रोजगाराचे लक्ष्य निश्चित केले आणि राज्यांना सुद्धा आवाहन केले. अशा प्रकारचा उपक्रम आयोजित करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे, याचा मला अभिमान आहे. आता येणाऱ्या आठवडाभरात 18,500 पोलिस भरतीची जाहिरात, महिनाभरात ग्रामविकास विभागाची 10,500 भरतीची जाहिरात, इतरही विभागात अनेक पदे भरण्यात येतील. असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
“महिलांचा अपमान केल्याप्रकरणी भिडेला अटक करा;” राष्ट्रवादीची मागणी
भरतीवरील अघोषित बंदी आता नाही. विशेष म्हणजे या सर्व भरतीसाठी पारदर्शक काम व्हावे, भरतीत घोटाळे होऊ नये म्हणून भारतभर मान्यता असलेल्या संस्था निवडण्यात आल्या आहेत. भरतीची ही प्रक्रिया न्यायालयातून खोळंबू नये, याचीही काळजी घेण्यात येईल. गेल्या 2.5 वर्षात काय झाले, हे तुमच्यापुढे आहेच. ही काही शेवटची भरती नाही, येणाऱ्या काळात आणखी रोजगार संधी निर्माण होणार आहेत. 1 लाख रोजगार निर्माण होतील असे सामंजस्य करार. इतरही प्रयत्नांना वेग देण्यात येत आहे. त्यामुळे काळजी करू नका. रोजगार देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. सेवेचा भाव कधी कमी होणार नाही, याची काळजी या तरुणांनी घ्यावी. सामान्य माणसाचे हे सरकार आहे, त्यामुळे जे लोक सेवेत येतील, त्यांनीही सामान्य माणसाला आस्था वाटेल, असेच काम केले पाहिजे ! पंतप्रधान यांचे खूप खूप आभार, त्यांनी सेवेची आणखी एक संधी दिली. असंही फडणवीस म्हणाले.
Read also
- “बेरोजगारांच्या डोळ्यात धुळ फेकण्याचे शिंदे-फडणवीसाचं काम”
- “कडू झालेले तोंड गोड करण्यासाठी सपन प्रकल्पाला मंजूरी.!” काॅंग्रेसने बच्चू कडूंना डिवचलं
- नरेंद्र मोदींकडून महाराष्ट्राला मोठं गिप्ट..! तब्बल 2 लाख कोटींचे 225 प्रकल्प मंजूर
- गुजरात विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर..! भाजपची सत्ता पणाला, तर केजरीवाल धमका करणार?
- “बच्चू कडू माझ्यासाठी छोटा विषय आहे, ते जर दम देत असेल तर..; 2 दिवसात राणांचा रवैया बदलला