पुणे : एकीकडे कोरोनारुग्णांची संख्या कमी होत चालली आहे, तर दुसरीकडे म्युकरमायकोसीसच्या (ब्लॅक फंगस) रुग्णांची संख्या राज्यात वाढत चालली आहे. अशातही विरोधक आणि सत्ताधाऱ्यांकडून एकमेकांवर सडकून टीका केली जात आहे. आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्यातील विरोधकांचा थेट ब्लॅक फंगस असा उल्लेख केला आहे.
पुण्यात एका कोविड सेंटरच्या ऑनलाईन उद्धाटनावेळी बोलताना संजय राऊत यांनी विरोधकांवर हल्ला चढवत त्यांना ब्लॅक फंगस असे संबोधले.
कोरोना उद्रेकाळाच्या काळात मुंबईत चांगलं काम झालं आहे. या कामाची दखल जागतिक आरोग्य संघटना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही घेतली. तरी देखील विरोधक टीका करत आहेत. या टीकेकडे शिवसैनिकांनी दुर्लक्ष करून कामावर लक्ष केंद्रित करावे, कारण विरोधक ब्लॅक फंगस आहेत, अशी बोचरी टीका राऊत यांनी केली.
राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली असून या दुसऱ्या लाटेत सामाजिक संस्थांसह सर्वसामान्य व्यक्ती झोकून देऊन काम करत आहेत. शहर आणि ग्रामीण भागात रुग्णालये उभारून रुग्णांना सेवा देणे ही मोठी राष्ट्रसेवा असल्याचे देखील ते कोविड सेंटरच्या उद्घाटनावेळी म्हणाले.
Read Also :
- एकाच दगडात दोन पक्षी मारणारे मलिक; आपल्याच सरकारला बदनाम करून घरचा आहेर देत आहेत
- अजितदादांनी आता स्वतःच कोकण दौरा करून, “दादा”स्टाईलने पंचनामे करून घ्यावेत
- मुख्यमंत्र्यांचा कोकण दौरा लिपस्टिक नव्हे; नुसता “पावडर दौरा” होता
- भाजप युवा मोर्चाचे सचिव प्रदीप गावडेंना, आयटी ॲक्ट ६७ अंतर्गत पोलिसांनी घेतलं ताब्यात
- ‘ठाकरे सरकार वादळग्रस्तांसाठी खंबीरपणे उभे, पण फडणवीसांनी केंद्राकडून राज्याला मदत मिळवून दिली पाहिजे’