मुंबई : नौदल अधिकाऱ्याला मारहाण केल्याप्रकरणी विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकार यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.
शिवसेनेच्या अग्रलेखातून, एकमेकांचा आदर करण्याची वेळ असल्याचे म्हटले आहे. तसेच मुख्यमंत्र्यांचे व्यंगचित्र हे बदनाम कारकच असल्याचे शिवसेनाने म्हटले आहे. यावर प्रवीण दरेकरांनी सेनेवर टीका केली आहे.
‘सत्तेचा माज आणि मस्ती काय असतो हे संजय राऊत यांनी करून दाखवलं आहे . एका बाजूला म्हणतात कायदा हातात घेणाऱ्याची गय नाही आणि दसरीकडे शिवसैनीक स्वतःच कायदा हातात घेतात आणि त्यांच्यावर कारवाई केली नाही ,यावरून दिसतं कि अहंकार किती डोक्यात गेलाय आहे. , अशी टीका दरेकर यांनी केली.