पंढरपूर: पंढरपूर विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. पंढरपूर मतदार संघात एखादी घटना घडली की संपूर्ण राज्याचे लक्ष तिकडे लागून राहते. सोलापुर जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाचे नेते आणि सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी कारखान्याचे अध्यक्ष कल्याणराव काळे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे समजते आहे.
शनिवारी दुपारी कल्याणराव काळे आणि जयंत पाटील यांची भेट होणार असल्याचे समजले आहे. त्या वेळी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे समजले आहे. मागच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेला त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. आता त्या प्रवेशाला डिड वर्ष झाले नाही तोच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला आहे.
कल्याणराव काळे हे सोलापूर जिल्ह्यातील नामांकित राजकारणी असून सहकार आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी मोठे जाळे पसरवले आहे. २०१४ या वर्षी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून शिवसेना पक्षात प्रवेश केला होता. परत त्यांनी कमल चिन्हाला लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान त्यांनी जवळ केले. भाजप सरकारकडून कारखान्यांना मदत न झाल्यामुळे ते नाराज झाले होते आणि मग त्यांनी राष्ट्रवादी पक्षात जाण्याचा निर्णय घेतला.