मुंबई : भाजप विरोधी आघाडीचे नेतृत्व कोण करणार हा प्रश्न गौण असून देशातील जनतेला पुढील लोकसभा निवडणुकीत राजकीय पर्याय देण्याची गरज आहे , असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले आहे. या वक्तव्यावरून भाजप नेते निलेश राणे यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडले.
देशातील 25 राज्यांनी पेट्रोलचे भाव कमी केले, महाराष्ट्रात अजून का नाही? – देवेंद्र फडणवीस
राणे ट्विटमध्ये म्हणाले की, पवार म्हणजे फक्त तडफड, पवार साहेब केंद्रात किमान 25 वर्षे आहेत आणि मोदी साहेब 7 वर्षे तरी पवारांना कुठेच जम बसवता आला नाही, अशी बोचरी टीका त्यांनी केली आहे. तसेच आंध्र प्रदेशचे सीएम 49 वर्षाचें, 25 पैकी 22 खासदार त्यांचे पण कधी ते नको ते उपद्व्याप करत नाहीत असं म्हणत त्यांनी पवारांना उद्देशून पवार साहेबांना आजही राजकारणात दुसऱ्याची मदत घ्यावी लागते, अशा शब्दात निलेश राणे यांनी शरद पवारांवर हल्लाबोल केला.
अनिल देशमुखांविरोधातील तपासात राज्य सरकारचे अडथळे; सीबीआयचा गंभीर आरोप
भाजपवर निशाणा साधत पवारांनी सध्यस्थितीत नरेंद्र मोदींना पर्याय म्हणून कोणाला तरी उभं करणं गरजेचे आहे, असे विधान केले होते. यासाठी विरोधकांनी एकत्र येणं अधिक गरजेचे असल्याचेही पवार म्हणाले होते. दरम्यान शरद पवार यांनी अनिल देशमुखांच्या अटकेवरून भाजपवर टीकास्त्र सोडले. देशमुखांना जो त्रास दिला जात आहे त्याचा एक एक मिनीट वसूल केला जाईल, असा इशारा त्यांनी भाजपाला दिला.
पवार म्हणजे फक्त तडफड, पवार साहेब केंद्रात किमान २५ वर्ष आहेत आणि मोदी साहेब ७ वर्षा पासून तरी पवारांना कुठेच जम बसवतां आला नाही. अंद्रा प्रदेशचे CM ४९ वर्षाचे, २५ पैकी २२ खासदार त्यांचे पण कधी नको ते उपद्व्याप ते करत नाही. पवार साहेबांना आजही राजकारणात दुसऱ्याची मदत घ्यावी लागते pic.twitter.com/4nDr4yw7jK
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) November 18, 2021
Read Also :
- ‘कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय नाईलाजाने’, चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली खंत
- एसटी कर्मचाऱ्यांचा पुढचा मोर्चा शरद पवार यांच्या घरावर; वंचित आघाडीचा इशारा
- ‘पंजाब आणि उत्तर प्रदेशच्या निवडणुकीला फटका बसेल म्हणून मोदींनी कायदे रद्द केले’; शरद पवारांचा सणसणीत टोला
- “कृषी कायदे लवकर मागे घेतले असते, तर हजारो शेतकऱ्यांचे प्राण वाचले असते”
- ‘सर्वसामान्य जनतेची ताकद देशाला कळली’; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कृषी कायद्यावर प्रतिक्रिया