नवी दिल्ली : केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेल उत्पादन कर कमी करून ग्राहकांना दिलासा दिल्यामुळे आता राज्य सरकारने पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट व अन्य कर कमी करावेत, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे आंदोलनातून केली होती. आता, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही राज्य सरकारने व्हॅट कमी करुन राज्यातील जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी केली आहे.
मुंबई काँग्रेसमधला अंतर्गत वाद सोनिया गांधींच्या दरबारी, झिशान सिद्दिकींची भाई जगतापांविरोधात तक्रार
केंद्र सरकारने पेट्रोल व डिझेलवरील उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर देशभरात पेटोल आणि डिझेलच्या दरात अनुक्रमे पाच व दहा रुपयांनी कपात झाली आहे. त्यानंतर, देशातील अनेक राज्यांनी व्हॅट कमी केला असून त्या प्रत्येक राज्यात पेट्रोलच्या किमती कमी झाल्या आहेत. मात्र, महाराष्ट्रात अद्यापही व्हॅट कमी करण्यात आला नाही. त्यावरुन, देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत राज्य सरकारवर निशाणा साधला. ‘केंद्राने पेट्रोलवर 5 रुपये आणि डिझेलवर 10 रूपये कमी केल्यावर 25 राज्यांनी ते दर आणखी कमी केले. महाराष्ट्रात का नाही?’, असा सवाल फडणवीस यांनी विचारला आहे.
25 States reduced the fuel prices further after GoI reduced ₹5 & ₹10 on petrol & diesel respectively.
WHY didn’t Maharashtra Govt do? pic.twitter.com/SC9csjiDlf— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) November 18, 2021
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने केंद्र सरकारचे अनुकरण करत व्हॅट व अन्य करत कपात करुन जनतेला दिलासा दिला पाहिजे. महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात सातत्याने आंदोलने केली होती. त्यामुळे आता केंद्राने इंधनावरील करात कपात केल्यानंतर आघाडी सरकारने इंधनावर लावलेले सर्व प्रकारचे कर कमी करावे, अशी मागणी भाजपाने आंदोलनादरम्यान केली होती.
Read Also :
- शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या धमक्यांना आम्ही घाबरत नाही – किरीट सोमय्या
- केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी शरद पवारांचे निमंत्रण नाकारले..!
- परमबीरसिंह ‘वॉण्टेड’ लिस्टमध्ये! ३० दिवसांत पोलिसांसमोर हजर न झाल्यास…
- अनिल देशमुखांचा जेलमधून बाहेर येण्याचा मार्ग बंद? सर्वोच्च न्यायालयाने ‘ती’ याचिका फेटाळली
- माझा पगार संजय राऊतांना देतो, त्यांनी त्यांचं घर चालवून दाखवावं; कर्मचाऱ्यानं खडेबोल सुनावलं