मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अनिल देशमुख यांचं कौतुक करताना त्यांच्या पाठीशी राष्ट्रवादी काँग्रेस असल्याचं स्पष्ट केलंय. तर शरद पवारांच्या आशीर्वादानं अनिल देशमुख यांना पुन्हा एकदा गृहमंत्रीपदावर बसवायचं असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हणाले. या पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
मुंबई काँग्रेसमधला अंतर्गत वाद सोनिया गांधींच्या दरबारी, झिशान सिद्दिकींची भाई जगतापांविरोधात तक्रार
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा धमक्यांना आम्ही घाबरत नाही. धमकी कोणाला ? सुप्रीम कोर्टला, हायकोर्टला, ईडीला, भाजपाला की किरीट सोमैयांना ? फक्त अनिल देशमुख नाही, जितेंद्र आव्हाडांची पण अटक झाली, आनंद अडसूळ यांची पण अटक झाली. महाराष्ट्राची जनता घोटाळेबाजांना सजा देणारच. घोटाळेबाजांवर कारवाई होणारच!, असं ट्विट करुन किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारला एकप्रकारे इशाराच दिला आहे.
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचा धमक्यांना आम्ही घाबरत नाही.
धमकी कोणाला !?
सुप्रिम कोर्टला, हायकोर्टला, ईडीला, भाजपाला की किरीट सोमैयांना !!?
फक्त अनिल देशमुख नाही, जितेंद्र आव्हाडांची पण अटक झाली, आनंद अडसूळ यांची पण अटक झाली
महाराष्ट्राची जनता घोटाळेबाजांना सजा देणारच pic.twitter.com/DDvbt8PTjb
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) November 18, 2021
गेल्या अनेक वर्षात पहिल्यांदा असं झालं आहे की मी नागपुरात आलो आणि माझ्यासोबत अनिल देशमुख नाहीत. अनिल देशमुख यांनी राष्ट्रवादीची जबाबदारी समर्थपणे सांभाळली. केंद्रातील सत्तेचा गैरवापर करुन राज्यातील सत्ता अस्थिर करण्याचा प्रयत्न सातत्याने सुरु आहे. या सरकारमध्ये राष्ट्रवादी महत्वाचा भाग आहे. काही लोकांना सत्ता हातातून गेल्याने अस्वस्थता आलीय. अस्थिरता निर्माण करायला अखंड प्रयत्न केलाय. वेगवेगळ्या एजन्सीच्या माध्यमातून छळवाद सुरु केल्याचा आरोप पवारांनी केलाय. मुंबईचे पोलीस आयुक्त माझ्याकडे आले आणि त्यांनी अनिल बाबूंबद्दल ही तक्रार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. अनिल देशमुख याचा दोष काय? हे मला समजत नाही. शहानिशा होईपर्यंत मी सत्तेत राहत नाही, असं मला देशमुख यांनी सांगितलं आणि स्वाभिमानाने त्यांनी राजीनामा दिला, असंही पवारांनी सांगितलं.
Read Also :
- केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी शरद पवारांचे निमंत्रण नाकारले..!
- परमबीरसिंह ‘वॉण्टेड’ लिस्टमध्ये! ३० दिवसांत पोलिसांसमोर हजर न झाल्यास…
- अनिल देशमुखांचा जेलमधून बाहेर येण्याचा मार्ग बंद? सर्वोच्च न्यायालयाने ‘ती’ याचिका फेटाळली
- माझा पगार संजय राऊतांना देतो, त्यांनी त्यांचं घर चालवून दाखवावं; कर्मचाऱ्यानं खडेबोल सुनावलं
- विदर्भ दौऱ्या दरम्यान शरद पवारांना आली अनिल देशमुखांची आठवण; म्हणाले..