पुणे – भाजपचे जेष्ठ नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह २६ नोव्हेंबरला शुक्रवारी पुण्यात येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत गणेश क्रिडा कला मंच, स्वारगेट येथे पुणे शहर भाजप कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात येणार आहे. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस व प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. अशी माहिती शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी दिली आहे
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शाह यांना पुणे भेटीचे निमंत्रण दिले होते. पवारांच्या या निमंत्रणावरून शाह पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटला भेट देणार होते. परंतु अमित शाह यांच्या दौऱ्यामध्ये इन्स्टिट्यूटला भेट देण्याचा उल्लेख नसल्याचे एका वृत्तवाहिनीने सांगितले आहे.
मुंबई काँग्रेसमधला अंतर्गत वाद सोनिया गांधींच्या दरबारी, झिशान सिद्दिकींची भाई जगतापांविरोधात तक्रार
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शाह यांना पुणे भेटीचे निमंत्रण दिले होते. शाह यांच्याकडे सहकार खाते आल्याने सहकार खात्याशी संबंधित मुद्यांबाबत ही भेट होती. त्यात महाराष्ट्रातील साखर कारखानदारीवरही चर्चा होणार असल्याचे समजले होते. शाह यांनी सुद्धा या भेटीला होकार दर्शवला होता. त्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कही लढवले जात होते. पण अमित शाह यांनी निमंत्रण नाकारल्याचे समोर येत आहे.
Read Also :
- परमबीरसिंह ‘वॉण्टेड’ लिस्टमध्ये! ३० दिवसांत पोलिसांसमोर हजर न झाल्यास…
- अनिल देशमुखांचा जेलमधून बाहेर येण्याचा मार्ग बंद? सर्वोच्च न्यायालयाने ‘ती’ याचिका फेटाळली
- माझा पगार संजय राऊतांना देतो, त्यांनी त्यांचं घर चालवून दाखवावं; कर्मचाऱ्यानं खडेबोल सुनावलं
- विदर्भ दौऱ्या दरम्यान शरद पवारांना आली अनिल देशमुखांची आठवण; म्हणाले..
- गोपीचंद पडळकरांच्या जीवाला धोका, त्यांना विशेष सुरक्षा द्या; फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र