नागपूर – राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे काल नागपूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांचे स्वागत करण्यासाठी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. विशेष म्हणजे नागपुरात जमावबंदी असताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. नागपूर महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. अशात जिल्हातील राष्ट्रवादीचे प्रमुख नेते अनिल देशमुख कारागृहात आहेत. त्यामुळं राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या या दौऱ्याला महत्त्व आलं आहे. महापालिका निवडणुकीत उभे राहू इच्छिणाऱ्यांनी पवारांच्या स्वागतासाठी रांगा लावल्या होत्या.
“विक्रम गोखले कोण? स्वातंत्र्य लढ्याचा अपमान करणाऱ्या व्यक्तीच्या मध्यस्थीची गरज नाही”
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा त्यांचा विदर्भ दौरा महत्त्वाचा मानला जातो. विशेष म्हणजे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अनुपस्थितीत हा दौरा होत आहे.
अनिल देशमुख हे सध्या तुरुंगात आहेत. ते नसताना शरद पवार हे कार्यकर्त्यांमध्ये प्राण फुंकण्यासाठी हा दौरा करीत आहे. नागपूरमध्ये भाषणात शरद पवार यांनी अनिल देशमुख यांची आठवण काढत त्यांची कौतुक देखील केले. ‘गेल्या अनेक वर्षात पहिल्यांदा असं झालं आहे की मी नागपुरात आलो आणि माझ्यासोबत अनिल देशमुख नाहीत. अनिल देशमुख यांनी राष्ट्रवादीची जबाबदारी समर्थपणे सांभाळली.’ असं म्हणत त्यांनी देशमुखांचे कौतुक केले.
कारवाईच्या भीतीने बुलढाण्यातील संपकरी एसटी कर्मचाऱ्याने उचललं टोकाचं पाऊल
केंद्रातील सत्तेचा गैरवापर करुन राज्यातील सत्ता अस्थिर करण्याचा प्रयत्न सातत्याने सुरु आहे. या सरकारमध्ये राष्ट्रवादी महत्वाचा भाग आहे. काही लोकांना सत्ता हातातून गेल्याने अस्वस्थता आलीय. अस्थिरता निर्माण करायला अखंड प्रयत्न केलाय. वेगवेगळ्या एजन्सीच्या माध्यमातून छळवाद सुरु केल्याचा आरोप पवारांनी केलाय. मुंबईचे पोलीस आयुक्त माझ्याकडे आले आणि त्यांनी अनिल बाबूंबद्दल ही तक्रार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. अनिल देशमुख याचा दोष काय? हे मला समजत नाही. शहानिशा होईपर्यंत मी सत्तेत राहत नाही, असं मला देशमुख यांनी सांगितलं आणि स्वाभिमानाने त्यांनी राजीनामा दिला, असंही पवारांनी सांगितलं.
Read Also :
- गोपीचंद पडळकरांच्या जीवाला धोका, त्यांना विशेष सुरक्षा द्या; फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
- खोट्या केसमध्ये वडिलांना तुरूंगात टाकलं, भाऊ बेपत्ता आहे, आम्हाला न्याय द्या; तरूणीने टाहो फोडला
- “अनिल देशमुखांना जेलमध्ये टाकल्याची भाजपाला किंमत चुकवावी लागेल”
- झूठ की सारी दिवारों को गिराते जायेंगे; नवाब मलिकांच्या ट्विट’ने पुन्हा संभ्रम