नागपूर – राज्यात गाजलेल्या १०० कोटींच्या वसुलीच्या आरोपाच्या चौकशीसाठी राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे माजी गहृमंत्री अनिल देशमुख ईडीच्या कोठडीत आहेत. यावरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार संतापले. विदर्भाच्या दोऱ्यात एका कार्यक्रमात म्हणालेत ”अनिल देशमुखांना जेलमध्ये टाकल्याची त्याची किंमत भाजपाला चुकवावी लागेल.”
..तर पुण्यातील येरवडा इस्पितळात तुम्हाला दाखल करावं लागेल; राऊतांचा फडणवीसांवर पलटवार
या संदर्भात उल्लेखनीय आहे की, याप्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुखांवर वसुलीबाबत आरोप केले होते. सध्या ते बेपत्ता आहेत. आरोप सिद्ध करण्यासाठी पुढे येत नाहीत. शरद पवारांनी पहिल्यांदाच अनिल देशमुखांची उघडपणे बाजू मांडली. अनिल देशमुख यांच्यासोबत जे झाले तो अन्याय आहे, असे पवार म्हणालेत.
अमरावती हिंसाचार प्रकरणी आणखी एका भाजप नेत्याला अटक; माजी मंत्र्यासह १० जणाचं आत्मसमर्पन
तसेच यावेळी त्यांनी तपास यंत्रणांच्या धाडीवरुन भाजपवर निशाणा साधला. राज्य सरकारनं जाहीर केलंय की परमबीर सिंग भगोडा आहे. परमबीर यांनी केलेले आरोप खोटे आहेत. खोटे आरोप करणारा अधिकारी बाहेर आहे आणि अनिल देशमुख आत आहेत. सत्ता गेली म्हणून काही लोक अस्वस्थ आहेत. ते केंद्राकडे लिस्ट पाठवतात आणि त्याची चौकशी करायला सांगतात. संजय राऊत यांच्या पत्नीली ईडीची नोटीस बजावली. अजित पवार यांच्याबद्दल काही करता येत नाही. म्हणून राज्य सरकार अस्थिर करण्यासाठी त्यांच्या बहिणीच्या घरात धाडसत्र सुरु केलं. अजित पवार यांच्या घरी आयटीचे लोक पाच दिवस बसले. ते दिल्लीचे आदेश होते. हसन मुश्रीफ यांच्याबद्दल चौकशी करतात. महाराष्ट्र राज्य हातचं गेलं, ते परत मिळत नाही. म्हणून ईडीच्या माध्यमातून त्रास दिला जातो. तुम्ही कितीही त्रास द्या. सामान्य जनता तुम्हाला कहीही सत्तेत येऊ देणार नाही. जनता आज ना उद्या वसूल करेल, असा घणाघात पवारांनी केलाय.
Read Also :
- झूठ की सारी दिवारों को गिराते जायेंगे; नवाब मलिकांच्या ट्विट’ने पुन्हा संभ्रम
- शरद पवार यांचा यवतमाळ आणि वर्धा दौरा रद्द..!
- सातारा जिल्हा बँकेत पाटणकर विरुद्ध मंत्री देसाईत होणार हायहोल्टेज लढत; ५२ मतदारावर ठरणार राजकीय भवितव्य
- कोल्हापूरात सतेज पाटील आज करणार शक्तिप्रदर्शन; दिग्ग्ज मंत्री, आमदार, खासदारांच्या उपस्थितीत भरणार उमेदवारी अर्ज
- ‘एक पक्ष आणि एक गाव मात्र फडणवीसांना टोला आणि गडकरीचं कौतुक, काय म्हणाले पवार… पहा’