मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. ते चार दिवसात नागपूर, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यांचा दौरा करतील. यादरम्यान ते कार्यकर्त्यांच्या भेटी आणि सभा घेणार आहेत. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांचा विदर्भ दौरा महत्वाचा मानला जात आहे. विदर्भ हा भाजपचा गड मानला जातो. आता त्याच गडात राष्ट्रवादी आपली पकड मजबूत करण्याच्या प्रयत्नात आहे.
भाजपचे ‘मिशन पुणे’ ; अमित शहांच्या हस्ते निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडणार
गुरुवारी शरद पवार यांनी नागपूरमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विरोधकांवर जोरदार फटकेबाजी केली. विशेष म्हणजे नागपुरात जमावबंदी असताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. नागपूर महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. अशात जिल्हातील राष्ट्रवादीचे प्रमुख नेते अनिल देशमुख कारागृहात आहेत. त्यामुळं राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या या दौऱ्याला महत्त्व आलं आहे. महापालिका निवडणुकीत उभे राहू इच्छिणाऱ्यांनी पवारांच्या स्वागतासाठी रांगा लावल्या होत्या.
शिवसेना नेते संजय राऊत राज ठाकरेंच्या भेटीला; राजकारणापलीकडची भेट?
शरद पवार हे कार्यकर्त्यांमध्ये प्राण फुंकण्यासाठी हा विदर्भ दौरा करीत आहेत. मात्र शरद पवार यांचा यवतमाळ आणि वर्धा जिल्हा दौरा रद्द झाल्याची माहिती समोर येत आहे. नागपूरचा दौरा करून शरद पवार परतीच्या मार्गाला लागणार आहे. प्रकृतीच्या कारणास्तव यवतमाळ आणि वर्धा जिल्हा दौरा रद्द केल्याची माहिती मिळाली आहे.
Read Also :
- सातारा जिल्हा बँकेत पाटणकर विरुद्ध मंत्री देसाईत होणार हायहोल्टेज लढत; ५२ मतदारावर ठरणार राजकीय भवितव्य
- कोल्हापूरात सतेज पाटील आज करणार शक्तिप्रदर्शन; दिग्ग्ज मंत्री, आमदार, खासदारांच्या उपस्थितीत भरणार उमेदवारी अर्ज
- ‘एक पक्ष आणि एक गाव मात्र फडणवीसांना टोला आणि गडकरीचं कौतुक, काय म्हणाले पवार… पहा’
- मुंबई काँग्रेसमधला अंतर्गत वाद सोनिया गांधींच्या दरबारी, झिशान सिद्दिकींची भाई जगतापांविरोधात तक्रार
- सत्तासंघर्ष भाग ४ : सतेज पाटलांचा अवघ्या २२ दिवसांत पराभव करणारे अमल महाडिक विधानपरिषदेचे उमेदवार