सातारा : सातारा जिल्हा बँकेची निवडणूक रणधुमाळी सध्या सुरु आहे. संपूर्ण सातारा जिल्हयाचे लक्ष लागलेल्या पाटण सोसायटी मतदार संघातील गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांच्या सहकारातील निवडणुकीकडे सर्वच राजकारण्यांच्या नजरा आता लागल्या आहे.
शरद पवारांकडून नवाब मलिकांची पाठराखण; म्हणाले, ‘अधिकारांचा गैरवापर करणाऱ्याला…
सातारा जिल्ह्याचे राजकीय वातावरण आता विधानसभेच्या रणसंग्रामाप्रमाणे तापले आहे. एकूण १०२ पैकी ५२ मते मिळवणारा उमेदवार विजयी होणार आहे. स्वाभाविकच या ५२ मतदारांच्या मतदानावर तालुक्याचे राजकीय भवितव्य अवलंबून राहणार आहे. सातारा जिल्हा बँकेचा इतिहास बघता या बँकेत अनेक वर्षांपासून माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांचा वरचष्मा होता. स्वतःसह त्यांनी निष्ठावंत असलेल्या स्वर्गीय तात्यासाहेब दिवशीकर, एल. एम. पवार, मंगल पवार, देशमुख आदींना बँकेत संधी दिली होती. अगदी सध्याचे मंत्री देसाई यांचे पिताश्री स्व. शिवाजीराव देसाई यांचाही स्व. तात्यासाहेब दिवशीकर यांच्याकडून पराभव करण्यात मंत्री पाटणकरांना यश आले होते.
मी कडवा शिवसैनिक, भगव्याशी बेईमानी करणार नाही; ‘त्या’ प्रकरणावरून रामदास कदम कडाडले
गेल्या अनेक वर्षांत मंत्री देसाई गटाकडून स्वतःच्या घराण्यातील उमेदवार न देता पाटणकरांना शह देण्यासाठी कार्यकर्त्यांना उमेदवारी देण्यात आली. यामध्ये काही वेळा पाटणकर बिनविरोध निवडून आले तर काही वेळा केवळ तांत्रिक कुस्त्या झाल्या. यावेळची निवडणूक ही राजकीय प्रतिष्ठा व अस्तित्वाची ठरणार आहे. स्वतः देसाई हे पहिल्यांदाच बँकेच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत उतरले आहेत. जिल्ह्यातील त्यांचा राजकीय दबदबा, प्रतिष्ठा व आगामी काळातील राजकारणावर यातील जय-पराजयाचे परिणाम दिसून येतील. ना. देसाई यांनी अतिशय आत्मविश्वासाने उमेदवारी केलीय यात शंकाच नाही. त्यांना कोणत्याही परिस्थितीत विजयी व्हावेच लागेल, असे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे .
“नागपुरात जमावबंदी असताना शरद पवार यांच्या सभेला परवानगी कशी?”
बँकेत सातत्याने विजय मिळवत आलेल्या पाटणकर गटाकडूनही यावेळी पहिल्यांदाच सत्यजितसिंहांना संधी देण्यात आली असून त्यांच्या दृष्टीनेही ही निवडणूक तितकीच महत्त्वाची आहे. विधानसभेत झालेल्या पराभवाची परतफेड करणे आणि पुन्हा आपले राजकीय शक्तिप्रदर्शन करणे यासाठी पाटणकरांना ही नामी संधी आहे. आता देसाई विरुद्ध पाटणकर संघर्षात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Read Also :
- कोल्हापूरात सतेज पाटील आज करणार शक्तिप्रदर्शन; दिग्ग्ज मंत्री, आमदार, खासदारांच्या उपस्थितीत भरणार उमेदवारी अर्ज
- ‘एक पक्ष आणि एक गाव मात्र फडणवीसांना टोला आणि गडकरीचं कौतुक, काय म्हणाले पवार… पहा’
- मुंबई काँग्रेसमधला अंतर्गत वाद सोनिया गांधींच्या दरबारी, झिशान सिद्दिकींची भाई जगतापांविरोधात तक्रार
- सत्तासंघर्ष भाग ४ : सतेज पाटलांचा अवघ्या २२ दिवसांत पराभव करणारे अमल महाडिक विधानपरिषदेचे उमेदवार
- सातारा जिल्हा बँक निवडणुकीत शशिकांत शिंदेंचे टेन्शन वाढले; विरोधी उमेदवार रांजणे निर्णायक मते घेऊन नॉट रिचेबल