कोल्हापूर : राज्यात ६ जागांसाठी विधानपरिषद निवडणूक आता जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये कोल्हापूरचा देखील समावेश आहे. या निवडणुकांसाठी १० डिसेंबर रोजी मतदान होणार असून १४ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. कोल्हापूरचे विद्यमान पालकमंत्री आणि राज्यमंत्री सतेज पाटील हे सध्या या जागेवर आमदार आहेत. कोल्हापूरच्या विधानपरिषदेची राजकीय रणांगण चांगलेच तापलेले दिसत आहे. विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास मंगळवार पासून सुरुवात झालेली आहे. मात्र आत्तापर्यंत एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केलेला नाही. पालकमंत्री सतेज पाटील हे महाविकास आघाडीकडून उमेदवार असणार आहेत.
शरद पवारांकडून नवाब मलिकांची पाठराखण; म्हणाले, ‘अधिकारांचा गैरवापर करणाऱ्याला…
दुसऱ्या बाजूने भारतीय जनता पक्षाकडून माजी आमदार अमल महाडिक यांना रणांगणात उतरवले जाणार आहे. त्यांच्या उमेदवारीच्या घोषणेची आता फक्त औपचारिकता बाकी राहिलेली आहे. माजी आमदार महादेवराव महाडिक हे त्यांच्या बाजूने केंद्रस्थानी असणार आहेत. त्यांनी आतापासूनच भेटी-गाठींचा सपाटा लावलेला आहे. माजी आमदार महादेवराव महाडिक हे या भागातून एकदा विधानपरिषद आमदार असल्याने त्यांना देखील या निवडणुकीचा चांगलाच अनुभव आहे. त्यांनी नुकतीच या संदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली होती. एवढंच नाही तर त्यांनी आमदार प्रकाश आवडे, आमदार विनय कोरे, जिल्हा परिषद सदस्य राहुल पाटील यांची भेट घेतली आहे.
मी कडवा शिवसैनिक, भगव्याशी बेईमानी करणार नाही; ‘त्या’ प्रकरणावरून रामदास कदम कडाडले
दुसरीकडे सतेज पाटील हे गेल्या सहा महिन्यांपासून या निवडणुकीची तयारी करण्यात व्यस्त आहेत. समोरून अजूनही उमेदवार न दिल्याने बंटी पाटील सध्या निवडणुकीत आघाडीवर आहेत. आज दिग्ज मंत्र्यांच्या उपस्थितीत बंटी पाटील उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यामध्ये ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर, जिल्हा परिषद अध्यक्ष राहूल पाटील, खासदार प्रा.संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, आमदार पी.एन.पाटील, आमदार प्रकाश आबीटकर, आमदार राजूबाबा आवळे, आमदार राजेश पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार ऋतुराज पाटील तसेच विविध राजकीय पक्षांचे नेते, संघटनांचे नेते, संस्थांचे नेते आणि इतरही कार्यकर्ते सतेज उर्फ बंटी पाटलांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उपस्थित राहणार आहेत.
Read Also :
- ‘एक पक्ष आणि एक गाव मात्र फडणवीसांना टोला आणि गडकरीचं कौतुक, काय म्हणाले पवार… पहा’
- मुंबई काँग्रेसमधला अंतर्गत वाद सोनिया गांधींच्या दरबारी, झिशान सिद्दिकींची भाई जगतापांविरोधात तक्रार
- सत्तासंघर्ष भाग ४ : सतेज पाटलांचा अवघ्या २२ दिवसांत पराभव करणारे अमल महाडिक विधानपरिषदेचे उमेदवार
- सातारा जिल्हा बँक निवडणुकीत शशिकांत शिंदेंचे टेन्शन वाढले; विरोधी उमेदवार रांजणे निर्णायक मते घेऊन नॉट रिचेबल
- “नागपुरात जमावबंदी असताना शरद पवार यांच्या सभेला परवानगी कशी?”