नागपूर – नागपूर शहरात जमावबंदी लागू असल्याने आमच्या आंदोलनाला परवानगी नाकारली जाते. मग जमावबंदी आदेश लागू असताना शरद पवार यांच्या सभेला परवानगी कशी दिली? असा सवाल स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी उपस्थित केला आहे.
ठाकरे सरकार काळे झेंडे दाखवण्याच्याच लायकीचं, पडळकरांचा घणाघात
रविकांत तुपकर यांनी मीडियाशी संवाद साधताना हा सवाल केला आहे. नागपूर शहरात कलम 144 लागू असतानाही शरद पवार यांच्या सभेला परवानगी कशी? असा सवाल करत रविकांत तुपकर यांनी थेट पोलिसांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्हं उपस्थित केला आहे.
“आजारी मुख्यमंत्री, आजारी सरकार”; राणेंचा पुन्हा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
तुपकर यांचं नागपुरात ‘बेमुदत अन्नत्याग आंदोलन’ सुरु झालं आहे. कापसाला 12000 रुपये भाव मिळावा, आणि सोयाबीनला 8 हजार रुपये क्विंटल भाव मिळावा, या मागणीसाठी तुपकर संविधान चौकात बेमुदत उपोषणाला बसले आहेत. नागपुरात जमावबंदीचे आदेश असल्यानं तुपकर यांनी आंदोलन करू नये यासाठी पोलिसांनी नोटीस बजावलीय. मग नागपूरात कलम 144 लागू असतानाही शरद पवार यांच्या सभेला परवानगी कशी? पोलीसांचा सर्वांना समान न्याय का नाही? असा सवाल तुपकर यांनी उपस्थित केला आहे.
Read Also :
- मी कडवा शिवसैनिक, भगव्याशी बेईमानी करणार नाही; ‘त्या’ प्रकरणावरून रामदास कदम कडाडले
- हिंसाचार प्रकरणी मालेगावात रझा अकादमीच्या कार्यालयावर पोलिसांचा छापा; महत्वाचा दस्तावेज ताब्यात
- कारवाईच्या भीतीने बुलढाण्यातील संपकरी एसटी कर्मचाऱ्याने उचललं टोकाचं पाऊल
- “विक्रम गोखले कोण? स्वातंत्र्य लढ्याचा अपमान करणाऱ्या व्यक्तीच्या मध्यस्थीची गरज नाही”
- कोई नाचनेवाली बोलती है तो मै उसपर उत्तर नही देना चाहता; मंत्री विजय वडेट्टीवार कंगनावर संतापले