कोल्हापूर : राज्यात ६ जागांसाठी विधानपरिषद निवडणूक आता जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये कोल्हापूरचा देखील समावेश आहे. या निवडणुकांसाठी १० डिसेंबर रोजी मतदान होणार असून १४ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. कोल्हापूरचे विद्यमान पालकमंत्री आणि राज्यमंत्री सतेज पाटील हे सध्या या जागेवर आमदार आहेत.
“आजारी मुख्यमंत्री, आजारी सरकार”; राणेंचा पुन्हा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
कोल्हापूरचे राजकारण हे सर्व महाराष्ट्राला ज्ञात आहे. सतेज पाटलांनी महाडिक घराण्याला जवळपास सर्वच राजकीय पदांवरून घालवले आहे. आता महाडिक देखील आपल्या पराभवाचे उट्टे काढण्यासाठी सरसावले आहे. माजी आमदार महादेवराव महाडिक जे महाडिक घराण्याचे किंगमेकर आहेत आता ते स्वतः मैदानात उतरून कमान सांभाळणार आहेत. त्यांनी आमच्याच घरात उमेदवारी द्यावी असा शब्द देखील टाकला होता.
कोई नाचनेवाली बोलती है तो मै उसपर उत्तर नही देना चाहता; मंत्री विजय वडेट्टीवार कंगनावर संतापले
त्यांच्याच सांगण्यावरून माजी आमदार अमल महाडिक यांची उमेदवारी निश्चित होणार आहे. अमल महाडिक हे तेच आहेत ज्यांनी मागच्यावेळी अवघ्या २२ दिवसांत प्रचार करून सतेज उर्फ बंटी पाटलांचा पराभव केला होता. २०१९च्या विधानसभेला काही गणिते फिस्कटली आणि अमल महाडिक यांचा बंटी पाटलांचे पुतणे त्रुतुराज पाटील यांनी थेट पराभव केला. त्यानंतर गोकुळमध्येही बंटी पाटलांनी आणि हसन मुश्रीफांनि मिळून महाडिकांना अस्मान दाखवले होते. महाडिक यांना सलग पराभव झाल्यामुळे त्या पराभवाची परतफेड विधानपरिषदेच्या निमित्ताने करायची आहे.
“विक्रम गोखले कोण? स्वातंत्र्य लढ्याचा अपमान करणाऱ्या व्यक्तीच्या मध्यस्थीची गरज नाही”
त्यामुळे महाडिक घराण्यातील उमेदवार द्यावा असा त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांकडे जोर धरला होता. आता महाडिकांना विजयी करण्यासाठी दस्तुरखुद्द राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोल्हापुरातील भाजपच्या मित्रपक्षांना साद घातली आहे. आमदार विनय कोरे, आमदार प्रकाश आवाडे, जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे असे सर्वच जण महाडिकांना निवडणुकीत मदत करणार आहेत. आता कोल्हापुरातील घटनांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. बंटी पाटील हे देखील आपल्या विजयी घौडदौडीला कायमी ठेवण्यासाठी सरसावलेले आहेत. आता त्यांना रोखण्यात महाडिकांना कितपत यश येते हे पाहणे औत्सुकतेचे ठरणार आहे.
Read Also :
- सातारा जिल्हा बँक निवडणुकीत शशिकांत शिंदेंचे टेन्शन वाढले; विरोधी उमेदवार रांजणे निर्णायक मते घेऊन नॉट रिचेबल
- “नागपुरात जमावबंदी असताना शरद पवार यांच्या सभेला परवानगी कशी?”
- मी कडवा शिवसैनिक, भगव्याशी बेईमानी करणार नाही; ‘त्या’ प्रकरणावरून रामदास कदम कडाडले
- हिंसाचार प्रकरणी मालेगावात रझा अकादमीच्या कार्यालयावर पोलिसांचा छापा; महत्वाचा दस्तावेज ताब्यात
- कारवाईच्या भीतीने बुलढाण्यातील संपकरी एसटी कर्मचाऱ्याने उचललं टोकाचं पाऊल