सातारा : सातारा जिल्हा बँकेची निवडणूक जशी जशी जवळ येत आहे तशी तशी राजकीय रंगत आता वाढू लागली आहे. त्यातच आता आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले हे बिनविरोध झाल्याने त्यांचे टेन्शन फ्री झाले आहे. दोन्ही राजे जरी बिनविरोध झाले असले तरी देखील बाकीचे दिग्ज नेते आणि मंत्री यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
ठाकरे सरकार काळे झेंडे दाखवण्याच्याच लायकीचं, पडळकरांचा घणाघात
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत सरावात जास्त रंगत आता जावळी सोसायटी मतदारसंघात होणार आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि आमदार शशिकांत शिंदे यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ज्ञानदेव रांजणे यांनी आव्हान उभे केले आहे. राजणे यांनी विजयचे गणित डोक्यात ठेऊन निर्णयक २८ मतदारांना सुरक्षित स्थळी रवाना केले आहे. आता सध्या प्रचार सुरु आहे आणि आमदार शशिकांत शिंदे हे जावळी तालुक्यात तळ ठोकून असून स्वतः फिरून मतदारांशी संपर्क करण्यात व्यस्त आहे. त्यांच्या पुढे राष्ट्रवादीच्याच कार्यकर्ता विरोधात असल्यामुळे त्याचे टेन्शन वाढले आहे. त्यातच ज्ञानदेव रांजणे हे नॉट रिचेबल असल्याने गुंतागुंत आणखी वाढली आहे.
“आजारी मुख्यमंत्री, आजारी सरकार”; राणेंचा पुन्हा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता असल्याने रांजणे हे माघार घेतील, या विश्वासावर आमदार शिंदें राहिले. मात्र अर्ज मागे घेण्याच्या दिवशी रांजणे यांच्याशी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, मकरंद पाटील यांनीही संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांचा संपर्क होऊ शकला नाही. तसेच मला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जावळीतून लढण्यास सांगितले असल्याचे सांगत त्यांनी आपला अर्ज मागे घेतला नाही. परिणामी शशीकांत शिंदेंची अडचण झाली. त्यावेळपासून रांजणे हे नॉट रिचेबल आहेत ते आजपर्यंत कोणाच्याच संपर्कात आलेले नाहीत. ते राजस्थानमध्ये आहेत असं देखील माहित झालेलं आहे.
कोई नाचनेवाली बोलती है तो मै उसपर उत्तर नही देना चाहता; मंत्री विजय वडेट्टीवार कंगनावर संतापले
जावळी सोसायटी मतदारसंघात ४९ मतं आहेत ज्यांना २४ पेक्षा जास्त मते पडतील तो उमेदवार निवडून येणार आहे. त्यातच रांजणे यांच्याकडे २८ मतदार आहेत. ते राजस्थान परिसरात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या मतदारांपर्यंत कोणी पोहोचू नये, तसेच ऐनवेळी दगा फटका होऊ नये, हे लक्षात घेऊन रांजणे या मतदारांसह नॉट रिचेबल आहेत. रांजणे यांच्या नॉट रिचेबल भूमिकेमुळे शिंदेंचे टेन्शन वाढले आहे.
Read Also :
- “नागपुरात जमावबंदी असताना शरद पवार यांच्या सभेला परवानगी कशी?”
- मी कडवा शिवसैनिक, भगव्याशी बेईमानी करणार नाही; ‘त्या’ प्रकरणावरून रामदास कदम कडाडले
- हिंसाचार प्रकरणी मालेगावात रझा अकादमीच्या कार्यालयावर पोलिसांचा छापा; महत्वाचा दस्तावेज ताब्यात
- कारवाईच्या भीतीने बुलढाण्यातील संपकरी एसटी कर्मचाऱ्याने उचललं टोकाचं पाऊल
- “विक्रम गोखले कोण? स्वातंत्र्य लढ्याचा अपमान करणाऱ्या व्यक्तीच्या मध्यस्थीची गरज नाही”