मुंबई : मागील काही दिवसांत महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजविणाऱ्या घटना घडल्या आहेत. त्यामधील एक घटना होती १०० कोटींच्या वसुलीची. माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंह यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात १०० कोटींची वसुली करण्याचा आदेश दिल्याचा आरोप केला होता. यावरून मोठी खळबळ उडाली होती.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी शरद पवारांचे निमंत्रण नाकारले..!
यानंतर अनिल देशमुख यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. यानंतर बऱ्याच काळासाठी अनिल देशमुख फरार होते. अनिल देशमुखांची घरे, कार्यालये आणि इतरही संपत्तीवर सीबीआय, ईडीने छापेमारी केली होती. यानंतर एका मागून एक घडामोडी घडल्या. काही दिवसांमध्ये अनिल देशमुख यांना अटक देखील करण्यात आली. त्यानंतर परमबीरसिंह यांनी कोर्टाला सांगितले होते की आता माझ्याकडे अनिल देशमुखांविरोधात पुरावे शिल्लक राहिलेले नाहीत. आणि नंतर परबीरसिंह हे देखील फरार झाले. कालच परमबीरसिंह यांना कोर्टाने फरार घोषित केले आहे आणि कारवाईचे आदेश दिले आहेत.
मुंबई काँग्रेसमधला अंतर्गत वाद सोनिया गांधींच्या दरबारी, झिशान सिद्दिकींची भाई जगतापांविरोधात तक्रार
अनिल देशमुखांवर सध्या कारवाई सुरु आहे. अनिल देशमुख यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराप्रकरणी सुरू असलेल्या तपासाला खीळ बसावी, त्यात तपास यंत्रणेला अपयश यावे, यासाठी राज्य सरकार ‘निर्लज्जपणे’ प्रयत्न करत आहे. त्यामुळे या याचिकेद्वारे दिलासा मिळविण्यास राज्य सरकार पात्र नाही, असा युक्तिवाद सीबीआयनेउच्च न्यायालयात बुधवारी केला.
माझा पगार संजय राऊतांना देतो, त्यांनी त्यांचं घर चालवून दाखवावं; कर्मचाऱ्यानं खडेबोल सुनावलं
अनिल देशमुख यांच्याविरोधात सुरू असलेल्या तपासप्रकरणी सीबीआयने राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे व पोलीस महासंचालक संजय पांड्ये यांना बजावलेले समन्स रद्द करा, या मागणीसाठी राज्य सरकार तर्फे उच्च न्यायालयात एक याचिका दाखल करण्यात आली आहे. न्या. नितीन जामदार व न्या. सारंग कोतवाल यांच्या खंडपीठापुढे याची सुनावणी सुरू आहे. यात राज्य सरकारला काहीही दिलासा देऊ नका, अशी मागणी सीबीआयतर्फे अतिरिक्त सॉलिसीटर जनरल अमन लेखी यांनी केली.
Read Also :
- देशातील 25 राज्यांनी पेट्रोलचे भाव कमी केले, महाराष्ट्रात अजून का नाही? – देवेंद्र फडणवीस
- शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या धमक्यांना आम्ही घाबरत नाही – किरीट सोमय्या
- केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी शरद पवारांचे निमंत्रण नाकारले..!
- परमबीरसिंह ‘वॉण्टेड’ लिस्टमध्ये! ३० दिवसांत पोलिसांसमोर हजर न झाल्यास…
- अनिल देशमुखांचा जेलमधून बाहेर येण्याचा मार्ग बंद? सर्वोच्च न्यायालयाने ‘ती’ याचिका फेटाळली