सांगली : राज्य सरकारने महसूलमध्ये वाढ व्हावी, त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य भाव मिळावा यासाठी वाईन मोठ-मोठ्या शॉपी, मॉल आणि किराणा दुकानात विकण्यास परवानगी दिली आहे. पण ज्या दुकानांचं क्षेत्रफळ एक हजार चौरसफुट आहे, अशाच दुकानांना वाईन विकता येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या कालच्या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. पण राज्य मंत्रिमंडळाच्या या निर्णयाला शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी विरोध केला आहे. या निर्णयावरुन त्यांनी रोष व्यक्त केला आहे. तसेच किराणा दुकानांना दारु विक्रीस परवानगी दिली मग अफू-गांजाच्या शेतीला नाही कसे म्हणायचे? असा उपरोधिक सवाल संभीजी भिडे यांनी केला आहे.
म्हापसा मतदार संघाच्या विकासाचे वडिलांचे स्वप्न पूर्ण करणार – जोशुआ डिसुझा
“लोकशाहीत विचार स्वातंत्र्य, आचार स्वातंत्र्य अशी 10 प्रकारची स्वातंत्र्ये आहेत. महाराष्ट्र सरकारने प्रगतीचे पाऊल पुढे टाकले आहे. विकासासाठी, राज्याची अर्थव्यवस्था मजबूत पाहिजे त्यासाठी फार मोठे प्रगतीचे काम केले आहे. दारु प्राशन केलेल्या यादवांच्यात भांडणे हाणामारी झाली. श्रीकृष्णने स्वतः मुसळ घेऊन त्यांचा संहार केला. तसाच दारू कुठेही मिळणार हा निर्णय नाश करणारा निर्णय आहे. जुगार खेळताना पांडवांचे राज्य गेले, भीम रागावला, प्रतिज्ञा केली तसा राग येणारा भीम आता नाही”, अशा शब्दांत संभाजी भिडेंनी खंत व्यक्त केली.
आज लोकशाहीचे संरक्षण झाले, १२ आमदारांबद्दलचा निर्णय लोकशाही वाचविणारा – देवेंद्र फडणवीस
“आर आर आबांची आज आठवण येते. त्यांनी सगळ्यांच्या विरोधात जाऊन डान्सबार बंदी केली. ते आज हयात असते तर हा निर्णय झाला नसता. तुकोबा-ज्ञानेश्वर यांचा हा आत्म उद्धार करणारा आपला समाज. तसेच आरक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या संघटनानी या निर्णयासाठी पेटून उठले पाहिजे. एक मराठा लाख मराठा या घोषणेचा अभिमान वाटतो. मराठा क्रांती मोर्चाने या निर्णय विरोधात आंदोलन केले पाहिजे. हा निर्णय गलिच्छ आहे. एकही आमदार-मंत्री या निर्णयावर थुंकतो, असे म्हणून बाहेर पडला नाही. लिव्ह आणि रिलेशनशिपचा निर्णय देणाऱ्या न्यायाधीशांना पण संपवलं पाहिजेल”, असं संभाजी भिडे म्हणाले.
मालाडमधील ‘या’ रस्त्याला दिले टिपू सुलतानाचे नाव; भाजप आमदाराने पाठींबा दिल्यामुळे पक्ष पडला तोंडावर
“हा मंत्रिमंडळाचा निर्णय आहे. हा काही परराष्ट्राने लादलेला निर्णय नाही. मी मुंबईला नाईट लाईफ देणार आहे, असे म्हणणारे देश राज्याला व्यभिचाराच्या दिशेने नेणारे आहेत. अफू गांजा यांची शेती करायला मग नाही कसे म्हणायचे? या सगळ्याला आम्ही विरोध करणार आहोत. या निर्णयाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्रिमंडळाशी बोलणार आहोत. सर्व पंथ, गटतट यातील साधूंनी उठून कामाला लागायची गरज आहे”, असं आवाहन भिडे यांनी केलं.
Read also:
- न्यायालयाचे दिलासे एकाचा राजकीय पक्षाला कसे मिळतात? शिवसेना नेते संजय राऊतांचा सवाल
- यांना काय कळतं शेतीतलं? चंद्रकांत पाटलांनी पुन्हा संजय राऊतांना डिवचलं
- कोरोनासोबत जगण्यासाठी नवीन नियमावली बनवायला हवी – आरोग्य मंत्री राजेश टोपे
- जामीन नाकारला हा झटका नसून तो दिलासा आहे – निलेश राणे
- केंद्र सरकारकडे ६२५ करोड रुपये पडून आहेत; राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा आरोप