मुंबई : राज्य सरकारने विधानसभा अधिवेशनात भारतीय जनता पक्षाच्या 12 आमदारांना निलंबित केले होते. पण, आता भाजपच्या या 12 आमदारांचे निलंबन सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले आहे. या निर्णयाचे भाजपकडून स्वागत केले जात आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे सध्या गोवा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात आहेत. यावेळी त्यांनीही या निर्णयाचे स्वागत केले आणि ‘सत्यमेव जयते’ अशी प्रतिक्रिया दिली.
काँग्रेसला मोठं खिंडार; मालेगावच्या महापौरांसह 27 नगरसेवकांच्या हाती राष्ट्रवादीचं घड्याळ
देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून कोर्टाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. ‘राज्य विधिमंडळात ओबीसींच्या हक्कांसाठी संघर्ष करणाऱ्या भाजपाच्या 12 आमदारांचे बेकायदेशीर निलंबन रद्द ठरविणारा, लोकशाही वाचविणारा आणि ऐतिहासिक निकाल दिल्याबद्दल मा. सर्वोच्च न्यायालयाचे मन:पूर्वक आभार या निकालाचे आम्ही स्वागत करतो. हे निलंबन रद्द झाल्याबद्दल भाजपाच्या 12 आमदारांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो’, असे फडणवीस म्हणाले.
उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी लोबो समर्थकांनी केली गर्दी; निवडणूक आयोग कारवाई करणार?
तसेच, ‘कुठलेही कारण नसताना आणि इतक्या प्रदीर्घ कालावधीसाठी निलंबन हे असंवैधानिक आहे, केवळ कृत्रिम बहुमतासाठी ते करण्यात आले, हे आम्ही प्रारंभीपासूनच सांगत होतो. आज सर्वोच्च न्यायालयाने तेच सांगितले. हा केवळ 12 आमदारांच्या निलंबनाचा प्रश्न नव्हता, तर त्या मतदारसंघातील 50 लाखाहून अधिक मतदारांचा प्रश्न होता. आज लोकशाहीचे संरक्षण झाले’, अशी प्रतिक्रिया फडणवीसांनी दिली आहे.
या बारा आमदारांचे निलंबन मागे
आशिष शेलार (वांद्रे पश्चिम),अभिमन्यू पवार (औसा),गिरीश महाजन (जामनेर),पराग अळवणी (विलेपार्ले),अतुल भातखळकर (कांदिवली पूर्व),संजय कुटे (जामोद, जळगाव),योगेश सागर (चारकोप),हरीश पिंपळे (मूर्तीजापूर),जयकुमार रावल (सिंधखेड),राम सातपुते (माळशिरस),नारायण कुचे (बदनपूर, जालना),बंटी भांगडिया (चिमूर)
Read also:
- म्हापसा मतदार संघाच्या विकासाचे वडिलांचे स्वप्न पूर्ण करणार – जोशुआ डिसुझा
- महाविकास आघाडी म्हणजे ‘मद्य विक्री आवडी’ सरकार; भाजप नेत्या चित्रा वाघ यांचा टोला
- मोठी बातमी: भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन रद्द, ठाकरे सरकारला दणका
- टिपू सुलतान हे इंग्रजांसोबत लढताना ‘शहीद’ झाले होते; नवाब मालिकांचा नवीन जावईशोध
- मुंबईत कोणाला दंगल हवी आहे? टिपू सुलतान नामकरणावरून महापौर किशोरी पेडणेकर भडकल्या