मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून मुंबईमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्षात संघर्ष सुरु आहे. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी एका मैदानाचे उदघाट्न केले ज्या मैदानाचे नाव टिपू सुलतान यांच्या नावावरून देण्यात आले होते.
काँग्रेस भवनावरून इंदापूरात हायहोल्टेज राडा; हर्षवर्धन पाटील विरुद्ध संजय जगताप संघर्ष पेटणार
यावरून भारतीय जनता पक्षातील नेत्यांनी शिवसेनेवर टीकेची झोड उठवली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील शिवसेनेवर जहरी टीका केली आहे. शिवसेनेला आता हिंदुत्वाचा विसर पडला आहे असं त्यांनी म्हटलं होतं . टिपू सुलतान सारख्याच्या समर्थनार्थ हिंदुत्ववादी पक्ष असणारी शिवसेना बोटचेपी भूमिका घेत आहे असं देखील फडणवीसांनी म्हटलं आहे.
न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर कणकवली पोलिसांत येरझारा; नितेश राणे म्हणतात…
आता याच मुद्यावरून शिवसेना नेत्या आणि मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. मालाडमधील मैदानाला टिपू सुलतान नाव द्यायचं आहे की नाही हे ठरलेलं नसताना भाजपला मात्र मुंबई अशांत करण्यासाठी दंगल घडवायचा मानस आहे असा गंभीर आरोप किशोरी पेडणेकर यांनी केला आहे.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला नक्षलवाद्यांचा पाठींबा; गोंदियात झळकले बॅनर-पत्रकं
मालाडमध्ये होत असलेल्या मैदानाला टिपू सुलतान असं नाव देण्याचं महापालिकेनं कधी ठरवलंच नाही. भाजपला या न झालेल्या गोष्टीवरुन मुंबई अस्थिर करायची आहे. कुणाला हवीय दंगल? दंगल घडवून तरी दाखवा, मग बघा, असं देखील किशोरी पेडणेकर यांनी म्हटलं आहे. टिपू सुलतान यांचं नाव मुंबईतील मैदानाला या आधीही देण्यात आलं होतं. पण भाजप आता राजकारण करत असून मुंबईची कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचं काम करत आहे असा आरोपही त्यांनी केला.
Read also:
- उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी लोबो समर्थकांनी केली गर्दी; निवडणूक आयोग कारवाई करणार?
- काँग्रेसला मोठं खिंडार; मालेगावच्या महापौरांसह 27 नगरसेवकांच्या हाती राष्ट्रवादीचं घड्याळ
- राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा राजीनामा घेणार का? टिपू सुलतान प्रकरणावरून संजय राऊतांचा सवाल
- गोवा निवडणूक २०२२: जोशुआ डिसुझा यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल
- अजित पवारांचा मुलगा जय पवार याचे कारनामे उघड करणार, तो तुरुंगात जाणार – किरीट सोमय्या