मुंबई : गेल्या दोन दिवसांपासून मुंबईमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पक्षात संघर्ष सुरु आहे. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी एका मैदानाचे उदघाट्न केले ज्या मैदानाचे नाव टिपू सुलतान यांच्या नावावरून देण्यात आले होते.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाला नक्षलवाद्यांचा पाठींबा; गोंदियात झळकले बॅनर-पत्रकं
यावरून भारतीय जनता पक्षातील नेत्यांनी शिवसेनेवर टीकेची झोड उठवली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील शिवसेनेवर जहरी टीका केली आहे. शिवसेनेला आता हिंदुत्वाचा विसर पडला आहे असं त्यांनी म्हटलं होतं . टिपू सुलतान सारख्याच्या समर्थनार्थ हिंदुत्ववादी पक्ष असणारी शिवसेना बोटचेपी भूमिका घेत आहे असं देखील फडणवीसांनी म्हटलं आहे. आता अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक हे देखील शिवसेनेच्या समर्थनार्थ टिपू सुलतान मैदानावरून उतरले आहेत. टिपू सुलतान हे इंग्रज सैन्याशी लढताना शाहिद झाले आहेत.
अजित पवारांचा मुलगा जय पवार याचे कारनामे उघड करणार, तो तुरुंगात जाणार – किरीट सोमय्या
टिपू सुलतान यांनी कधीही इंग्रजांसमोर शरणागती पत्करली नाही. ते एक स्वातंत्र्यसेनानी होते. टिपू सुलतान हे एक महान व्यक्ती ज्यांनी इंग्रजांना हादरून ठेवले होते आणि त्यांच्या नावाचा विरोध करण्याचे काम भाजप करत आहे.’, असे ट्विट करत नवाब मलिक यांनी चक्क टिपू सुलतानचे गोडवे गायल्याचे दिसत आहे. अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी आता टिपू सुलतान नामकरणाबाबत घेतलेल्या भूमिकेमुळे भारतीय जनता पक्षाकडून नक्कीच आक्रमक उत्तर येईल असे बोलले जात आहे. शिवसेनेने देखील मैदानाला टिपू सुलतानच्या दिलेल्या नावाबद्दल आपली भूमिका जाहीर केली आहे.
Read also:
- मुंबईत कोणाला दंगल हवी आहे? टिपू सुलतान नामकरणावरून महापौर किशोरी पेडणेकर भडकल्या
- उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी लोबो समर्थकांनी केली गर्दी; निवडणूक आयोग कारवाई करणार?
- काँग्रेसला मोठं खिंडार; मालेगावच्या महापौरांसह 27 नगरसेवकांच्या हाती राष्ट्रवादीचं घड्याळ
- राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा राजीनामा घेणार का? टिपू सुलतान प्रकरणावरून संजय राऊतांचा सवाल
- गोवा निवडणूक २०२२: जोशुआ डिसुझा यांनी केला उमेदवारी अर्ज दाखल