मुंबई : राज्य मंत्रिमंडळ बैठकीत आज मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातल्या सुपर मार्केटमध्ये आता वाईनची विक्री करण्यास परवानगी देण्यात आली आहे. हा प्रस्ताव आधी विचाराधीन होता. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याबद्दलचा निर्णय घेण्यात आला. १००० चौरस फुटाच्या दुकानातच वाईन विक्री करता येणार आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा राजीनामा घेणार का? टिपू सुलतान प्रकरणावरून संजय राऊतांचा सवाल
याबद्दल बोलताना राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक म्हणाले, महाराष्ट्रात बऱ्याच वाईनरी असताना आता १००० चौरस फुटांच्या छोट्या दुकानांमध्ये वाईन विक्रीला परवानगी देण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या फळ उत्पादनावर वाईनरी चालते. त्यांना चालना देण्यासाठी वाईन विक्री करता येणार आहे.
राज्यात आधी दारू स्वस्त केली नि आता किराणा दुकानात वाईन विक्रीला परवानगी..तरुणाईला व्यसनाधिनतेची चटक लावू पाहणारा हा निर्णय सरकारनं बेधुंदावस्थेत घेतलाय की काय?
हे मविआ म्हणजे ‘मद्य विक्री आवडी’ सरकार!
राज्य बेवड्यांच्या ताब्यात दिल्यावर असंच होणार..
या निर्णयाचा कडाडून विरोध!
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) January 27, 2022
दरम्यान, भाजपाच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी या मुद्यावरुन राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली आहे. राज्यात आधी दारू स्वस्त केली आणि आता किराणा दुकानातून वाईन विक्रीला परवानगी दिली आहे. राज्यातील तरुणाईला व्यसनाधीनतेची चटक लावणारा हा निर्णय आहे. त्यामुळे महाविकास आघाडीने बेधुंदावस्थेत हा निर्णय घेतला आहे का? असा सवालही चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे. तसेच, राज्य बेवड्यांच्या हातात दिल्यावर असेच होणार…अशा शब्दांत या निर्णयाचा निषेधही चित्रा वाघ यांनी नोंदवला आहे.
वाह रे सरकार तेरा खेल..सस्ती दारु महंगा तेल
करप्शन करने पर कुर्सी और बोलने पर जेल..
महिला सुरक्षा पर चुप और अपराधियो से मेल..
तीनो पार्टियां अब वाइन करेंगी राशन दुकानों पर सेल..
वाह रे सरकार तेरा खेल सस्ती दारू महंगा तेल..#जब_मिल_बैठेंगे_तीन_यार#सरकार_बेवड़ा_और_ठेकेदार
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) January 28, 2022
Read also:
- मोठी बातमी: भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन रद्द, ठाकरे सरकारला दणका
- टिपू सुलतान हे इंग्रजांसोबत लढताना ‘शहीद’ झाले होते; नवाब मालिकांचा नवीन जावईशोध
- मुंबईत कोणाला दंगल हवी आहे? टिपू सुलतान नामकरणावरून महापौर किशोरी पेडणेकर भडकल्या
- उमेदवारी अर्ज दाखल करतेवेळी लोबो समर्थकांनी केली गर्दी; निवडणूक आयोग कारवाई करणार?
- काँग्रेसला मोठं खिंडार; मालेगावच्या महापौरांसह 27 नगरसेवकांच्या हाती राष्ट्रवादीचं घड्याळ