मुंबई : शिवसेना १६ अपात्र आमदारांच्या सुनावणीचं वेळापत्रक विधानसभा अध्यक्षांनी जाहीर केलं आहे. त्याविरोधात आता ठाकरे गटातील नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. सुप्रीम कोर्टात विधानसभा अध्यक्षांविरोधात ठाकरे गटाच्या याचिकेवरची सुनावणी 3 ऑक्टोबरला होणार होती परंतु आता पुढची तारीख 6 ऑक्टोबरला जाहीर करण्यात आली आहे.
हेही वाचा…महायुतीतील लोकसभा निवडणुकीचा पहिला उमेदवार ठरला, ? कॅबिनेट मंत्र्यांनी ‘या’ नेत्याचं नाव केलं जाहीर
विधानसभा अध्यक्षांनी अपात्र आमदारांवरील सुनावणीसंदर्भात वेळापत्रक जाहीर केला असून १३ ते २० ऑक्टोंबर दरम्यान कागदपत्रांची तपासणी होणार आहे. यातच सर्व याचिका एकत्र करायचा की नाही यावर १३ तारखेला सुनावणी होणार आहे. यानंतर दोन्ही गटांनी एकमेकांना दिलेली कागदपत्रांची विधिमंडळ तपासणी करणार आहे. तसेच २० ऑक्टोंबरला सर्व याचिका एकत्रित करायच्या की नाही यावर निकाल दिला जाणार आहे. दोन्ही गटातील आपलं म्हणणं मांडल्यानंतर २७ ऑक्टोंबर तारिख ठेवण्यात आली आहे. त्यानंतर दोन्ही गट आपापले मुद्देसुद मांडणी ६ नोव्हेंबरला करतील आणि दावे प्रतिदावे करतील. त्यानंतर १० नोव्हेंबरला दोन्ही गटांनी मांडलेल्या मुदद्यांच्या अनुषंगाने सुनावणी पार पडणार आहे. तर २० ऑक्टोंबरला दोन्ही गटांच्या साक्षीदारांची यादी जाहीर करण्यात येणार आहे. तर २३ ऑक्टोंबरला साक्षीदारांची उलट साक्ष घेतली जाणार आहे. सर्व पुरावे तापसल्यानंतर पुढील दोन आठवड्यात अंतिम सुनावणी पार पडणार आहे.
हेही वाचा…पक्ष फुटीनंतर शरद पवारांना अजून एक मोठा धक्का, ३० वर्षापासूनची सत्ता गेली, ‘या’ निवडणुकीत मोठा पराभव
दरम्यान, विधानसभा अध्यक्षांनी जाहीर केलेल्या वेळापत्रकावर आक्षेप घेतला अन् सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली. सुप्रीम कोर्टात विधानसभा अध्यक्षांविरोधात ठाकरे गटाच्या याचिकेवरची सुनावणी 3 ऑक्टोबरला नाही आता पुढची तारीख 6 ऑक्टोबर असून याचिका सुनावणीस येणार का ? याची उत्सुकता अध्यक्षांनी जाहीर केलेलं वेळापत्रक सुप्रीम कोर्ट मान्य करतं का ? याचे उत्तर पुढच्या सुनावणीत मिळणार आहे. त्यामुळे ती कधी होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…” ती लोक मराठी लोकांना खालच्या दर्जाचे, मांस खाणारे म्हणून हिनवतात म्हणून घरे मिळत नाहीत”, आव्हाडांचं ‘त्या’ व्हिडीओवरून मोठं भाष्य
हेही वाचा…एकनाथ शिंदेंच्या सेनेत इनकमिंग सुरूच, ठाकरेंचे ‘तीन’ शिलेदार शिंदेंच्या सेनेत दाखल
हेही वाचा…अजिदादांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न भंगणार ? भाजप नेत्यांनी दिले ‘हे’ संकेत
हेही वाचा…भाजपच्या ‘या’ खासदारांचे तिकीट कापणार, फडणवीस-शाह यांची बंद दाराआड चर्चा, नव्या उमेदवारांना संधी
हेही वाचा…पिंपरी-चिंचवडमध्ये ‘आयआयएम’ची शाखा उभारण्याचा संकल्प! महेश लांडगे यांची मागणी, फडणवीसांना दिले निवेदन