मुंबई : राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर अध्यक्ष शरद पवार यांना मोठा धक्का बसला आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडिअममधील प्रतिष्ठित गरवारे क्लबच्या निवडणुकीत शरद पवार यांच्या गटाचा मोठा पराभव झाला आहे. या क्लबच्या निवडणुकीसाठी डायनामिक ग्रुप आणि शरद पवारांचा डेव्हलपमेंट ग्रुप यांच्यात लढाई झाली होती. यामुळे शरद पवारांना याचा मोठा धक्का बसला आहे.
हेही वाचा..“आमदारांना, मोठी “फाईव्ह स्टार” हॉटेल्स, अन् पत्रकारांना मात्र एक चहा, तोही टपरीवरचा”, राष्ट्रवादीने डिवचलं
गरवारे क्लबच्या निवडणुकीत डायनामिक ग्रुपने एकहाती बाजी मारली आहे. त्यामुळे हा शरद पवारांसाठी मोठा पराभव मानला जात आहे.. त्याशिवाय भाजपचे नेते राज पुरोहित यांना देखील या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला आहे. ते याआधी उपाध्यक्ष होते, मात्र, आता त्यांच्या जागी उपाध्यक्ष म्हणून डायनामिक ग्रुपचे सायरस गोरीमार निवडून आले आहेत.
हेही वाचा…अजित पवार गटाच्या ‘त्या’ दाव्याची शरद पवार गटाकडून चिरफाड, पुराव्यानिशी आव्हाडांनी बोलती केली बंद
शरद पवार यांच्या डेव्हलपमेंट ग्रुप विरूद्ध डायनाॅमिक ग्रुप या दोन पॅनलमध्ये थेट लढत होती. या निवडणुकीत १३ हजार सामाजिक मतदारांनी मतदान केलं होतं. तीन दिवस ऑनलाईन आणि प्रत्यक्ष पद्धतीने मतदान झालं होतं. या निवडणुकीत शरद पवार विजयी झाले. पण त्यांच्या संपूर्ण पॅनलचा पराभव झाला आहे. शरद पवार गटाची जवळपास ३० वर्षापासून गरवारे क्लबमध्ये एकहाती वचर्स्व होते. पण त्यांचं हे वर्चस्व आता संपुष्टात आलं आहे. शरद पवार यांनी १२ कोटींवरून क्लबची २०० कोटीवर ठेवी नेल्या आहेत. पण या वर्षीच्या निवडणुकीत त्यांच्या पॅनलचा धुव्वा उडाला आहे.
READ ALSO :
हेही वाचा.“भारत मातेच्या घोषणा थांबवून मोदींच्या घोषणा,” बावनकुळेंचा आणखी एक व्हिडीओ चर्चेत
हेही वाचा…गिरीश महाजनांनी धनगर समाजाला ‘तो’ शब्द दिला, अन् २१ दिवस सुरूअसलेलं उपोषण घेतलं मागे
हेही वाचा…शरद पवारांनी मोदींचा ‘तो’ दावा खोडून काढला, पत्रकारांसमोरच मांडला सगळा इतिहास
हेही वाचा…बॉलिवुडची धक धक गर्ल “माधुरी दिक्षित” ‘या’ पक्षाकडून लोकसभा निवडणुक लढविणार ?
हेही वाचा…“१६ आमदारांच्या अपात्रतेच्या संदर्भात विधानसभा अध्यक्षांनी लवकर निर्णय घ्यावा,” पटोलेंची मागणी