अहमदनगर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सध्या विविध वक्तव्यावरून चर्चेत आले आहेत. अहमदनगर येथे विरोधात बातमी छापू नये म्हणून पत्रकारांना चहा पाजा, धाब्यावर न्या, असं विधान केल्यानंतर त्यांच्यावर जोरदार टिका करण्यात आली. यातच आता चंद्रशेखर बावनकुळे यांचा एक व्हिडीओ काॅंग्रेसचे नेते अतुल लोंढे यांनी ट्विट निशाणा साधला आहे.
हेही वाचा…अजित पवार गटाच्या ‘त्या’ दाव्याची शरद पवार गटाकडून चिरफाड, पुराव्यानिशी आव्हाडांनी बोलती केली बंद
भाजपचे प्रदेशाध्यक्ष सध्या अहमदनगर दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्याच्या वेळी चंद्रशेखर बावनकुळे विविध कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत. यातच भारत मातेच्या घोषणा तरूण देत असतांना त्यांनी तरूणांना थांबवून मोदींच्या घोषणा देण्यास सांगितलं आहे. यावर काॅंग्रेसचे नेते अतुल लोंढे यांनी व्हिडीओ शेअर केला आहे. त्याचबरोबर त्यांच्यावर जोरदार टिका देखील केली आहे.
हेही वाचा…“महिला आरक्षणाला कोणाचीही विरोध नाही,” शरद पवारांनी मोदींचा इतिहास बाहेर काढला
अतूल लोंढे यांनी ट्विटमध्ये असं म्हटलंय की, भाजपला भारत माता, प्रभू श्रीरामांपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदीच मोठे वाटतात हे कसले सनातनी हे तर बोगस ढाब्यावर चला वाले. अहमदनगर शहर दौऱ्यावर आले असता प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भारत मातेच्या घोषणा थांबवून उपस्थितांना नरेंद्र मोदींच्या घोषणा द्यायला लावल्या. यावरून भाजपचे देशप्रेम किती बेगडी आहे हे दिसून येते. चंद्रशेखर बावनकुळे मोदींचे फोटो असलेली पत्रके वाटताना दिसत असून मोदींच्या नावाच्या घोषणा उपस्थितांना द्यायला सांगत आहेत. यावेळी भारत माता की जय अशी घोषणा देणाऱ्याला त्यांनी हात करून घोषणा बंद करायला सांगत मोदींची घोषणा द्यायला लावल्या. हा प्रकार नगर शहरात एकदा नव्हे तर दोन वेगवेगळ्या ठिकाणी घडला आहे.
भाजपला भारत माता, प्रभू श्रीरामांपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदीच मोठे वाटतात हे कसले सनातनी हे तर बोगस ढाब्यावर चला वाले.
अहमदनगर शहर दौऱ्यावर आले असता प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रशेखर बावनकुळे यांनी भारत मातेच्या घोषणा थांबवून उपस्थितांना नरेंद्र मोदींच्या घोषणा द्यायला लावल्या.… pic.twitter.com/lvUlfnykdF
— Atul Londhe Patil (@atullondhe) September 26, 2023
READ ALSO :
हेही वाचा…गिरीश महाजनांनी धनगर समाजाला ‘तो’ शब्द दिला, अन् २१ दिवस सुरूअसलेलं उपोषण घेतलं मागे
हेही वाचा…शरद पवारांनी मोदींचा ‘तो’ दावा खोडून काढला, पत्रकारांसमोरच मांडला सगळा इतिहास
हेही वाचा…बॉलिवुडची धक धक गर्ल “माधुरी दिक्षित” ‘या’ पक्षाकडून लोकसभा निवडणुक लढविणार ?
हेही वाचा…“१६ आमदारांच्या अपात्रतेच्या संदर्भात विधानसभा अध्यक्षांनी लवकर निर्णय घ्यावा,” पटोलेंची मागणी
हेही वाचा“आमदारांना, मोठी “फाईव्ह स्टार” हॉटेल्स, अन् पत्रकारांना मात्र एक चहा, तोही टपरीवरचा”, राष्ट्रवादीने डिवचलं