अहमदनगर : भाजपच्या वतीने अहमदनगरच्या सावेडी येथे पदाधिकारी आणि बूथ कार्यकर्त्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकूळे यांनी पदाधिकाऱ्यांना आगामी निवडणुकीसंदर्भात विशेष सल्ला दिला आहे. पत्रकारांनी २०२४ पर्यंत आपल्याविरोधात बातम्या छापू नये, यासाठी त्यांना चहा प्यायला न्या. पत्रकारांना चहा प्यायला न्यायचं म्हणजे काय ते तुम्हाला समजलंच असेल. तसेच पत्रकारांना ढाब्यावर जेवायला घेऊन जा. असं विधान बावनकुळेंनी केलं आहे. त्यावरून राष्ट्रवादीच्या माजी महिला प्रदेशाध्यक्ष विद्या चव्हाण यांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.
हेही वाचा…प्रत्येक जिल्ह्यात भाजपचं माइक्रो प्लानिंग, राजकीय हालचालींना वेग
आमदारांना मोठी फाईव्ह स्टार हॉटेल्स, ५० खोके, सुरतमार्गे गुवाहाटी, काय डोंगर, काय झाडी आणि पत्रकारांना मात्र एक चहा, तोही टपरीवरचा वा. ढाब्यावर नेऊन खाऊ, पिऊ घाला, पण भाजप विरोधात एक बातमी येता कामा येऊ नये. पत्रकारांना इतकं हिन लेखू नका. भाजपला डोक्यावर बसवले ते लेखणीच्या व बुमच्या जोरावर सत्तेतून खाली खेचल्याशिवाय राहणार नाहीत. प्रत्येक क्षेत्रात प्रामाणिक माणसं शिल्लक आहेत, भाजपाने याचे भान ठेवावे. असा इशाराही विद्या चव्हाण यांनी दिलाय.
हेही वाचा…नागपूर शहरही तुंबलं, स्मार्ट सिटीसाठी कोट्यवधी पैशाचं काय झालं ? सेनेचा भाजपला खोचक सवाल
दरम्यान, चंद्रशेखर बावनकुळे तुम्ही राज्यातील पत्रकारांना काय चिरीमिरी घेणारे समजताय का ? देशातील १२ पत्रकार विकले गेले म्हणून सगळे पत्रकार स्वत: चा इमान विकतील असं नाही. दुसऱ्यांचे पक्ष फोडून, इडी सीबीआय सारख्या संस्थांचा धाक दाखवून ही भाजप विरूद्ध आवाज दाबत नाही आहे. त्यामुळे दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत तुमच्या पक्षातील सर्व नेत्यांच आणि अंधभक्तांची वाढलेली अस्वस्थता आम्ही समजू शकतो. पण त्यामुळे तुम्ही थेट पत्रकारांना चिरीमिरी द्यायला निघाले? असा सवाल विजय वडेट्टीवारांनी भाजपला केला आहे.
आमदारांना, मोठी “फाईव्ह स्टार” हॉटेल्स, 50 खोके…सुरत मार्गे गुहाटी..”काय डोंगर, काय झाडी” आणि पत्रकारांना मात्र एक चहा..तोही “टपरीवरचा” वाss ढाब्यावर नेऊन खाऊ, पिवू घाला..पण भाजपा विरोधात एक बातमी येता कामा नये.. वा @cbawankule वाss
पत्रकारांना इतक हिन लेखू नका…1/2@NCPspeaks— Vidya Chavan (@Vidyaspeaks) September 26, 2023
READ ALSO :
हेही वाचा…अजित पवार गटाच्या ‘त्या’ दाव्याची शरद पवार गटाकडून चिरफाड, पुराव्यानिशी आव्हाडांनी बोलती केली बंद
हेही वाचा…“महिला आरक्षणाला कोणाचीही विरोध नाही,” शरद पवारांनी मोदींचा इतिहास बाहेर काढला
हेही वाचा…डर अच्छा है! “माझ्या ट्विटनंतर अर्ध्या तासातच शिंदेंनी दौरा पुढे ढकलला,” ठाकरेंनी शिंदेंना डिवचलं
हेही वाचा…“खोके देऊन पक्ष फोडा, आता खाली खोके पुन्हा भरण्यासाठी नवीन मार्ग”
हेही वाचा…हेही वाचा…“खोके देऊन पक्ष फोडा, आता खाली खोके पुन्हा भरण्यासाठी नवीन मार्ग”