पुणे : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. अनेक जिल्ह्यात भाजपने जॅम्बो कार्यकारिणी सदस्यांची निवड देखील केली आहे. यांच्या बैठका आता प्रत्येक जिल्ह्यात सुरू झाल्या असून आता प्रत्येक जिल्ह्यात वेगवेगळी रणनिती भाजपकडून आखली जात आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यामध्ये जातीने लक्ष घालतांना दिसत आहेत.
हेही वाचा…बारामतीत भावजय विरूद्ध नणंद सामना होणार ? भाजपने सुप्रिया सुळेंच्या विरोधात मोठा डाव टाकला
नरेंद्र मोदींनाच पुढच्या निवडणुकीत पंतप्रधान करायचं अन् भाजपसह एनडीएतील सर्व मित्रपक्षांचे मिळून ४०० पेक्षा जास्त खासदार निवडणून आणायचे, असा प्रण भाजपच्या नेत्यांनी घेतला आहे. यातच आता प्रत्येक जिल्ह्यात निवडणूक व्यवस्थापन समिती बनवली आहे. त्या अंतर्गत विधानसभा संयोजकांची निवड भाजपने केलीय. विधानसभा संयोजक मतदारसंघात जाऊन नियोजन करणार आहेत.
हेही वाचा…शरद पवारांना आता राष्ट्रीय पातळीवरही मोठा धक्का, ‘७’ आमदारांनी शरद पवारांची साथ सोडली
दरम्यान, यातच पुणे शहाराध्यक्ष धीरज घाटे यांनी पुण्यासाठी जॅम्बो कार्यकारिणी जाहीर केली आहे. या कार्यकारिणीच्या सदस्यांच्या बैठकाही सुरू झाल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यात विधानसभा संयोजक नेमायला सुरूवात आली आहे. लवकरच भाजपकडून निवडणूक कार्यक्रम दिला जाणार आहे. अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…नागपूर शहरही तुंबलं, स्मार्ट सिटीसाठी कोट्यवधी पैशाचं काय झालं ? सेनेचा भाजपला खोचक सवाल
हेही वाचा…भाजपचे नेते कोंडी करीत आहेत का ? पत्रकारांच्या प्रश्नांवर पंकजा मुंडेंनी दिलं हसून उत्तर म्हणाल्या.., “
हेही वाचा…२ महिन्यांत मराठा पाट्या लावा, कोर्टाचे व्यापाऱ्यांना आदेश, राज ठाकरे म्हणाले, “मूठभर व्यापाऱ्यांनी हा..,”
हेही वाचा…आदित्य ठाकरेंचा बोचरा घाव, अन् एकनाथ शिंदेंनी दौराच रद्द केला, पाहा नेमकं काय घडलं ?
हेही वाचा…भाजप आणि शिंदे गटाचा वाद मिटला, ‘ती’ जागा कुणाच्या वाटेला ?