मुंबई : दसरा- दिवाळी पुर्वी मराठी पाट्या लावून आर्थिक उलाढाल वाढवण्याची व्यावसायिकांची हीच वेळ आहे. असा सल्ला देत सोमवारी उच्च न्यायालयाने राज्यातील व्यापाऱ्यांना दोन महिन्यांत दुकानांवर मराठी पाट्या लावा, असे आदेश कोर्टाने दिले आहेत. गेल्या वर्षी सरकारने महाराष्ट्रातील सर्व दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे आदेश दिले होते. त्यावर फेडरेशन ऑफ रिटेल ट्रेडर्स वल्फेअर असोसिएशनने न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर आता कोर्टाने आदेश दिले आहेत. यावर आता मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली प्रतिक्रिया दिलीय.
हेही वाचा…अजितदादांचं अमृता फडणवीसांकडून भरभरून कौतूक, म्हणाल्या, “अजितदादा सोबत असल्यामुळे खूप आनंदी”
पुढील २ महिन्यांत महाराष्ट्रातील दुकानं, आस्थापन ह्यांच्यावर मराठी पाट्या लागल्याचं पाहिजेत असा स्पष्ट निकाल सुप्रीम कोर्टाने दिला, त्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे मनापासून आभार मानतो. ‘मराठी पाट्या’ ह्या मुद्द्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गेली कित्येक वर्ष जो संघर्ष केला. त्याला आजच्या निर्णयाने एक मान्यताच मिळाली. मुळात ज्या राज्याची जी भाषा आहे त्या भाषेत दुकानं, आस्थापनं ह्यांच्यावर त्या भाषेत पाट्या असायला हव्यात इतका साधा नियम असताना, त्याला विरोध करून इथल्या मूठभर व्यापाऱ्यांनी हा लढा न्यायालयात का नेला? असा सवालही राज ठाकरेंनी केला आहे.
हेही वाचा…“शरद पवारांच्या निष्ठेपायी अपात्र झालो, तरी त्याची पर्वा नाही”, पवारांच्या ‘या’ शिलेदारांचं मोठं विधान
दरम्यान, महाराष्ट्रात असाल तर मराठीत इतर राज्यात असाल तर तिथल्या भाषेत पाट्या असणं किंवा त्या ठिकाणी त्या भाषेचा सन्मान करणं ह्यात विरोध करण्यासारखं काय होतं. तुम्ही जर व्यापारासाठी इथे महाराष्ट्रात येता तर इथल्या भाषेचा सन्मान तुम्ही केलाच पाहिजे. असं म्हणत राज ठाकरे यांनी महाराष्ट्र सैनिकांनी ह्या मुद्द्यावर संघर्ष केला, आता सर्वोच्च न्यायालयाने पण ह्यावर काही मूठभर व्यापाऱ्यांना चपराक दिली आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक दुकानावर आणि आस्थापनांवर ठळक मराठी भाषेतील पाटी हवी म्हणजे हवी, आणि हे पाहणं आता महापालिका प्रशासन आणि काही प्रमाणात पोलीस प्रशासनाचं काम आहे. दुकानदारांनी पण नसत्या भानगडीत पडू नये आणि न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करावा. असा सल्ला कार्यकर्त्यांना दिला आहे. तसेच इथलं सरकार लक्ष ठेवेल, कारवाई करेल ती करेल, पण माझ्या महाराष्ट्र सैनिकांचं पण लक्ष असेल हे विसरू नका. ‘मराठी पाट्या’ ह्याबाबत जागृती ही माझ्या महाराष्ट्र सैनिकांमुळे आली त्यासाठी तुमचं मनापासून अभिनंदन असंही राज ठाकरेंनी म्हटलंय.
सस्नेह जय महाराष्ट्र
पुढील २ महिन्यांत महाराष्ट्रातील दुकानं, आस्थापन ह्यांच्यावर मराठी पाट्या लागल्याचं पाहिजेत असा स्पष्ट निकाल सुप्रीम कोर्टाने दिला, त्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे मनापासून आभार. ‘मराठी पाट्या’ ह्या मुद्द्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गेली कित्येक वर्ष…— Raj Thackeray (@RajThackeray) September 26, 2023
READ ALSO :
हेही वाचा…आदित्य ठाकरेंचा बोचरा घाव, अन् एकनाथ शिंदेंनी दौराच रद्द केला, पाहा नेमकं काय घडलं ?
हेही वाचा…भाजप आणि शिंदे गटाचा वाद मिटला, ‘ती’ जागा कुणाच्या वाटेला ?
हेही वाचा…बारामतीत भावजय विरूद्ध नणंद सामना होणार ? भाजपने सुप्रिया सुळेंच्या विरोधात मोठा डाव टाकला
हेही वाचा…शरद पवारांना आता राष्ट्रीय पातळीवरही मोठा धक्का, ‘७’ आमदारांनी शरद पवारांची साथ सोडली
हेही वाचा…काळा चहा पिऊन आणि कोल्हापुरी पायताण दाखवत बावनकुळेंच्या वक्तव्याच्या ‘याठिकाणी’ जाहीर निषेध