पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. यातच आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार गटातील नेत्यांना अजित पवार गटाकडून ब्लॅकमेंलिग केलं जात असल्याचा आरोप आमदार रोहित पवारांनी केला. त्यानंतर अजित पवार गटाकडूनही रोहित पवारांना प्रत्युत्तर देण्यात आलं. यातच आता राष्ट्रवादीचं प्रकरण निवडणुक आयोगात गेलं असून याची पुढील सुनावणी ३ ऑक्टोंबरला होणार आहे. त्याआधी शरद पवार गटातील आमदारांनी शरद पवार साहेबांच्या निष्ठेपायी अपात्र झालो तरी पर्वा नाही, असं म्हटलं आहे.
हेही वाचा…29 तारखेला ‘कोणत्या’ तीन घोषणा होणार ? शरद सोनवणे यांच्या घोषणांकडे नागरिकांच्या नजरा
शरद पवार यांच्या निष्ठेपायी अपात्र झालो तरी त्याची आम्हाला पर्वा नाही. कारण त्यांच्यामुळे आम्ही राजकारणात आलो आहे. असं विधान परिषदेतील आमदार शशिकांत शिंदे यांनी म्हटलं आहे. शरद पवार यांच्यामळे अनेकदा पदे मिळाली, त्यांच्यासाघी त्याग करायचा असल्यास आमची तयारी आहे. निष्ठा विकून विष्ठेसाठी गेलेल्यांनी आमची काळजी करू नये. असा खोचक टोलाही शिंदे यांनी अजित पवार गटाला लगावला आहे.
हेही वाचा…करो या मरो…, शिवसेना १६ अपात्र आमदारांबाबत नार्वेकरांना निर्णय घ्यावाच लागणार ? निकालाकडे सगळ्याचं लक्ष
स्वत: च्या अपात्रतेची काळजी करावी. ते अपात्र जरी नाही झाले तरी जनतेच्या दरबारात अपात्र ठरतील. आम्ही निष्ठावंत आहोत. ज्या जनतेने निवडून दिले मात्र खोके घेण्यासाठी गद्दारी करायला गेलेल्यांनी आम्हाला शिकवू नये. अशी शाब्दिक टोलाही हाणला आहे.
‘शरदचंद्रजी पवार साहेबांच्या निष्ठेपायी अपात्र झालो तरी पर्वा नाही’
आम्ही आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या निष्ठेपायी अपात्र झालो तरी त्याची आम्हाला पर्वा नाही. कारण त्यांच्यामुळे आम्ही राजकारणात आलो. त्यांच्यामुळेच अनेकदा पदे मिळाली, त्यांच्यासाठी त्याग करायचा असल्यास आमची… pic.twitter.com/8up2W1c3tt
— Shashikant Shinde (@shindespeaks) September 25, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“..त्यामुळेच आजचा निर्णय राखून ठेवला,” शिंदे गटाच्या नेत्यांनी दिली महत्वाची माहिती
हेही वाचा…नार्वेकरांसमोर ठाकरे अन् शिंदे गटाच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद, पुढील सुनावणी ‘या’ तारखेला होणार
हेही वाचा…अजित पवार गटाकडून शरद पवार गटातील ‘या’ बड्या नेत्याला ऑफर, ऑफर नाकारत म्हणाले, “मी शरद पवारांचा पक्का शिलेदार”
हेही वाचा…“तर राज्यातील लोकसभेच्या ४८ जागा लढवू,” वंचितने ‘कुणाला’ दिला इशारा ? युतीची शक्यता धुसूर
हेही वाचा…“आता कोणाला कितीही धाब्यावर नेलं, तरी २०२४ मध्ये जनता भाजपला घरी बसवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही”