अहमदनगर : भाजपच्या वतीने अहमदनगरच्या सावेडी येथे पदाधिकारी आणि बूथ कार्यकर्त्यांच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकूळे यांनी पदाधिकाऱ्यांना आगामी निवडणुकीसंदर्भात विशेष सल्ला दिला आहे. पत्रकारांनी २०२४ पर्यंत आपल्याविरोधात बातम्या छापू नये, यासाठी त्यांना चहा प्यायला न्या. पत्रकारांना चहा प्यायला न्यायचं म्हणजे काय ते तुम्हाला समजलंच असेल. तसेच पत्रकारांना ढाब्यावर जेवायला घेऊन जा. असं विधान बावनकुळेंनी केलं आहे. त्यावरून आता राष्ट्रवादीने भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
हेही वाचा…“५० कोटींचं आमीष दाखवून राष्ट्रवादीत बंडखोरी, पुढच्या वर्षी आणखी ५० कोटी,” विरोधी पक्षनेत्याचा मोठा दावा
चहा-बिस्कीट देऊन व धाब्यावर नेऊन HMV पत्रकार कसे निर्माण करायचे, हा भाजपचा फॉर्म्यूला चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीरपणे जनतेला सांगितला आहे. जेव्हा पायाखालील वाळू सरकरत असते, तेव्हा अशा कल्पना येणं साहिजकच आहे. त्यामुळे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आयडीया अजितबात नवल वाटत नाहीत. परंतु महाराष्ट्रातील पत्रकारिता ही पुरोगामीत्वाच्या आदर्शांवर चालते. त्यामुळे मराठी पत्रकार बावनकुळेंच्या गोष्टींना भीक घालणार नाही. आता कोणाला कितीही धाब्यावर नेलं तरी जनता भाजपला २०२४ मध्ये घरी बसवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत. असा इशारा खासदार अमोल कोल्हे यांनी भाजपला दिला आहे.
हेही वाचा…“मनात, पोटात आणि ओठात काय ? हे शरद पवारांनाच माहिती”, गौतम अदाणी भेटीवर भाजप नेत्याची प्रतिक्रिया
दरम्यान, विरोधी आवाज हे लोकशाहीचे मुलभूत सौंदर्य आहे. परंतु भाजपाला हे मान्य नाही. लोकशाहीत वर्तमानपत्रे हि विरोधी पक्षाचे काम करतात. राज्यकर्त्यांवर अंकुश ठेवण्याचं काम करणे हे त्यांचे काम आहे. परंतु हे आवाज दाबण्याचे धडे खुद्द भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आपल्या कार्यकर्त्यांना देतात ही अतिशय गंभीर आणि निषेधार्ह बाब आहे. ज्याअर्थी बावनकुळे कार्यकर्त्यांना असे सल्ले देत आहेत. त्याअर्थी त्यांनी स्वतः अशा पद्धतीने काम केले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पत्रकारांना निर्भिडपणे काम करु द्यायचे नाही हे भाजपाचे धोरणच आहे. भाजपाने एकतर उघडपणे त्यांना लोकशाही व्यवस्था मान्य नाही हे सांगावे अन्यथा अशी बेजबाबदार विधाने केल्याबद्दल पत्रकारांची आणि जनतेची माफी मागावी. असं खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे.
.@cbawankule जी, चहा-बिस्कीट देऊन व धाब्यावर नेऊन #HMV पत्रकार कसे निर्माण करायचे, हा @BJP4Maharashtra चा फॉर्म्युला तुम्ही जाहीरपणे जनतेला सांगितला, त्याबद्दल तुमचे अभिनंदन! जेव्हा पायाखालील वाळू सरकत असते, तेव्हा अशा कल्पना येणं साहजिकच आहे, त्यामुळे तुमच्या या #Idea चं मला… https://t.co/6mBAUk8a96
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) September 25, 2023
READ ALSO :
हेही वाचा…29 तारखेला ‘कोणत्या’ तीन घोषणा होणार ? शरद सोनवणे यांच्या घोषणांकडे नागरिकांच्या नजरा
हेही वाचा…करो या मरो…, शिवसेना १६ अपात्र आमदारांबाबत नार्वेकरांना निर्णय घ्यावाच लागणार ? निकालाकडे सगळ्याचं लक्ष
हेही वाचा…“‘चल बाबा तुझ्याही घरी येतो’, ” फडणवीसांच्या ‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर भाजपचं स्पष्टीकरण
हेही वाचा…“पत्रकारांना चहा पाजा, धाब्यावर न्या,” बावनकुळेंच्या वक्तव्यानंतर खळबळ, विरोधी पक्षांचा भाजपवर हल्लाबोल
हेही वाचा…“कपटनीतीत गुंतलेले गृहमंत्र्यांचे लक्ष, २ पक्ष फोडण्यात,” ‘त्या’ व्हिडीओवरून राष्ट्रवादीचा हल्लाबोल