नागपूर : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रविवारी नागपूर शहातील पुर पाहणी करण्यासाठी गेले होते. यावेळी एक माणूस फडणवीसांशी बोलण्याचा प्रयत्न करत असतांना फडणवीसांनी त्या व्यक्तीला हातानं ओढून घेतल्याचा हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यावरून आता राज्यात विरोधी पक्षातील नेत्यांनी फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यावर आता भाजपकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.
हेही वाचा…सागर बंगल्यावर खलबतं, दिल्लीला जाता जाता अमित शाह महाराष्ट्रासाठी मोठा निर्णय घेणार
देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातील पूरग्रस्त भागांना भेट दिली. त्यावेळी सदर व्यक्ती आणि इतर अनेकांची इच्छा होती की देवेंद्र फडणवीसांनी आपल्याही घरी यावे, नागपूरातील प्रत्येकाचेच प्रेम असल्याने आपला नेता घरी यावा. अशी त्यांची इच्छा असण्यास गैर नाही. पण, प्रत्येकाच्या घरी जाणे नेत्यालाही शक्य होतेच असे नाही. पोलिस त्याला थांबवित असल्याने, देवेंद्र फडणवीस यांनी त्याचा हात धरुन गर्दीतून त्याला आपल्या जवळ घेतले आणि ‘चल बाबा तुझ्याही घरी येतो’, असे म्हटले आणि ते त्याचा हात धरुन त्याच्या घरी गेले सुद्धा! पण, अशा घटनेचे राजकारण कुणी करावे, तर जे कधीच जनतेत जात नाही त्यांनी. हा प्रकार किळसवाणा आणि नालायकपणाचा कहर आहे. असं भाजपने म्हटलं आहे.
हेही वाचा…“जिल्हा परिषद शाळा बंद करण्याच्या मनुवादी भाजपच्या हालचाली”, नाना पटोलेंचा भाजपवर हल्लाबोल
दरम्यान, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांनी विरोधी पक्षाचे रचनात्मक कार्य सोडून ‘ट्रोलिंग गँग’चे काम स्वीकारले, त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन! राज्यातील जनतेने नाकारल्याने आता तसेही तुम्हाला त्याशिवाय दुसरा कामधंदाही उरला नाही. असं प्रत्युत्तर देखील भाजपने विरोधकांना दिलं आहे.
उपमुख्यमंत्री @Dev_Fadnavis यांनी आज नागपुरातील पूरग्रस्त भागांना भेट दिली. त्यावेळी सदर व्यक्ती आणि इतर अनेकांची इच्छा होती की देवेंद्र फडणवीसांनी आपल्याही घरी यावे. नागपुरातील प्रत्येकाचेच प्रेम असल्याने आपला नेता घरी यावा, अशी त्यांची इच्छा असण्यात गैर नाही. पण, प्रत्येकाच्या… https://t.co/EHCBlNwYiS pic.twitter.com/N0jsF8wOoh
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) September 24, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“पत्रकारांना चहा पाजा, धाब्यावर न्या,” बावनकुळेंच्या वक्तव्यानंतर खळबळ, विरोधी पक्षांचा भाजपवर हल्लाबोल
हेही वाचा…“कपटनीतीत गुंतलेले गृहमंत्र्यांचे लक्ष, २ पक्ष फोडण्यात,” ‘त्या’ व्हिडीओवरून राष्ट्रवादीचा हल्लाबोल
हेही वाचा…“५० कोटींचं आमीष दाखवून राष्ट्रवादीत बंडखोरी, पुढच्या वर्षी आणखी ५० कोटी,” विरोधी पक्षनेत्याचा मोठा दावा
हेही वाचा…“मनात, पोटात आणि ओठात काय ? हे शरद पवारांनाच माहिती”, गौतम अदाणी भेटीवर भाजप नेत्याची प्रतिक्रिया
हेही वाचा…नाग नदीवर तब्बल २,११७ कोटी रूपये खर्च, तर पुर आलाच नसता, भाजपचा भोंगळ कारभार, राष्ट्रवादीची टिका