पुणे : कमी पटसंख्येच्या नावाखाली जिल्हा परिषद शाळा बंद करण्याच्या हालचाली मनुवादी भाजपा सरकारने सुरु केल्या आहेत. शिक्षण हक्क कायद्यानुसार मुलांना घरापासून जवळ शिक्षण उपलब्ध करुन देणे हे सरकारचे कर्तव्य आहे परंतु २० किलोमीटरच्या परिसरातील जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करुन एकच शाळा सुरु ठेवण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचं काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…“नफ़रत के बाजा़र में मोहब्बत की दुकान”, राहुल गांधींनी घेतली दानिश अलींची भेट
सरकारचा हा निर्णय बहुजन समाजातील मुलांना शिक्षणांपासून वंचित ठेवणारा आहे. कमी पटसंख्येच्या नावाखाली राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा बंद कराल, तर याद राखा, अशा इशारा देखील नाना पटोले यांनी राज्य सरकारला दिला आहे. कमी पटसंख्येचे कारण देत सरकार जिल्हा परिषदेच्या जवळपास १५ हजार शाळा बंद करुन समुह शाळा सुरु करणार असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत. या शाळांमधून १ लाख ८५ हजार विद्यार्थी शिकत आहेत तर २९ हजारांपेक्षा जास्त शिक्षक कार्यरत आहेत.
हेही वाचा…“संजय राऊत महामूर्ख, राऊतांना गाढवावर बसून फिरवायला पाहिजे”, अपक्ष आमदाराचा राऊतांवर हल्लाबोल
दरम्यान, पुणे जिल्हा परिषदेकडून नेमण्यात आलेल्या समितीकडून वारे गुरूजींवर आरोपांवर तथ्य नसल्याचा निष्कर्ष दिला आहे. पुणे जिल्ह्यातील वाबळेवाडीच्या जिल्हा परिषद शाळेचा कायपालट करण्यामध्ये वारे गुरूंजी यांचा मोलाचा वाटा होता. वारे गुरूजी यांच्यावर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी दोन वर्षापुर्वी आरोप करण्यात आले होते. त्यानंतर आता त्यांना जिल्हा परिषदकडून मोठा दिलासा मिळाला आहे.
कमी पटसंख्येच्या नावाखाली जिल्हा परिषद शाळा बंद करण्याच्या हालचाली मनुवादी भाजपा सरकारने सुरु केल्या आहेत.
शिक्षण हक्क कायद्यानुसार मुलांना घरापासून जवळ शिक्षण उपलब्ध करुन देणे हे सरकारचे कर्तव्य आहे परंतु २० किलोमीटरच्या परिसरातील जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करुन एकच शाळा सुरु… pic.twitter.com/w0yWbdtzXn
— Nana Patole (@NANA_PATOLE) September 23, 2023
READ ALSO :
हेही वाचा…मुसळधार पावसाने नागपूर शहर पाण्याखाली, फडणवीस सांयकाळी नागपूरात जाणार
हेही वाचा…अमित शहांच्या स्वागतासाठी मंत्र्यांची रांग, वडेट्टीवारांची राज्य सरकारवर जोरदार टिका, म्हणाले..हुजरेगिरी
हेही वाचा…“राज्यात पुन्हा भाजपचं सरकार येऊन देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील,” भाजप आमदाराचा मोठा दावा
हेही वाचा…काॅंग्रेसच्या ‘या’ माजी मंत्र्यांच्या मुलाने महिलेस दिली ठा’र मारण्याची धमकी, 16 जणांवर गुन्हा दाखल
हेही वाचा…रोहित पवारांविरोधात अजित पवार गट आक्रमक, ‘त्या’ आरोपांवर अजित पवार गटाचं जोरदार प्रत्युत्तर