मुंबई : संसदेच्या विशेष अधिवेशनात केंद्र सरकारने महिला आरक्षण विधेयक मंजूर केले आहे. या विधेयकांमुळे आता महिलांना लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये ३३ टक्के आरक्षण मिळणार आहे. या विधेयकाला सत्ताधारी पक्षासोबत विरोधकांनी देखील पाठिंबा दर्शविला आहे. परंतु आगामी लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन केंद्रातील सरकारचा जुमला असल्याची टिका शिवसेना खासदार संजय राऊतांनी केलीय. त्यावर आता अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी राऊतांवर जोरदार निशाणा साधला आहे.
हेही वाचा…“किती लोकांचे तोंड दाबतील?” सोमय्यांचा व्हिडीओ दाखवणाऱ्या चॅनेलवर ७२ तासांची बंदी
नरेंद्र भोंडेकर म्हणाले की, शक्तीकपूरपेक्षाही मोठी उपाधी द्यायची असली तर द्यायला पाहिजे. इतके मोठे महामूर्ख संजय राऊत आहेत. यांना शोभत नाहीत, महिला आरक्षण विधेयकावर संजय राऊतांनी दिलेली प्रतिक्रिया म्हणजे महिलांचा अपमान आहे. ज्या पद्धतीनं संजय राऊतांनी वक्तव्य केलं आहे, त्यानं समाजातील महिलांचा अपमान झाला आहे.
हेही वाचा…“भाजपाच्या सोबत असाल तर चौकशा, धाडी थांबतात अन् विरोधात बोलाल तर…,” सुप्रिया सुळे भाजपवर कडाडल्या
दरम्यान, एकीकडे ४५४ मतांनी लोकसभेत महिला आरक्षण विधेयक मंजूर झालं. यामध्ये सर्वपक्षीय खासदारांनी मतदान केलं. म्हणजे, त्यामध्ये शिवसेनेचेही खासदार आहेत, ज्यांनी महिला आरक्षण विधेयकाला समर्थन दिलं. त्यामध्ये संजय राऊत एकटेच विरोध करतात, म्हणजे यानं मुर्खाचाही कळस गाठला आहे. त्यामुळे यांना गाढवावर बसून फिरवायला पाहिजे, असं माझं मत आहे. असंही ते म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…“ते विधान अजित पवारांसाठी नव्हतं तर ‘या’ नेत्यासाठी होतं”, सुप्रिया सुळेंनी दिलं स्पष्टीकरण
हेही वाचा…इंडिया आघाडीत वाद वाढणार, शरद पवार गौतम अडाणींच्या भेटीला
हेही वाचा…सुप्रिया सुळे भाजपविरोधात आक्रमक, भाजपच्या ‘या’ खासदाराच्या विरोधात हक्कभंगाचा दाखल केला प्रस्ताव
हेही वाचा…“एकनाथ शिंदे, अजित पवार भाजपच्याच तिकीटावर निवडणुका लढतील”, ‘या’ बड्या आमदाराचा मोठा दावा
हेही वाचा…सांगली शहरासाठी भाजपची जॅम्बो कार्यकारिणी जाहीर, अनेक नव्या चेहऱ्यांना संधी