सांगली : आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन भाजपने मोठी रणनिती आखण्यास सुरूवात केली आहे. यासाठी भाजपने आता जुन्या कार्यकर्त्यांना डावलून नव्या चेहऱ्यांना आपल्या कार्यकारिणीत संधी दिली जात आहे. अलिकडेच पुणे आणि पिंपरी चिंचवड शहाराची भाजपने कार्यकारिणी जाहीर केली आहे. यातच आता सांगली शहराचीही भाजपने जॅम्बो कार्यकारीणी जाहीर केली आहे.
हेही वाचा…“रोहित पवार चार वर्षातच ‘दादा’ होऊ पाहतोय, “आमदार सुनील शेळकेंची रोहित पवारांवर जोरदार टिका
पुढील निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन भाजपने सांगली शहरासाठी जॅम्बो कार्यकारिणी जाहीर केली आहे. शुक्रवारी भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष निशीकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन १० उपाध्यक्ष, ४ सरचिटणीस, २६ पदाधिकाऱ्यांसह तब्बल ९० सदस्यांची जॅम्बो कार्यकारिणी जाहीर केली. यावेळी पालकमंत्री सुरेश खाडे, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे,खासदार संजय काका पाटील उपस्थित होते.
हेही वाचा…“तेव्हा कोणाची उंची किती आहे ते कळेल ?” शिंदे गटाची आदित्य ठाकरेंवर टिका, आता ठाकरे गटाकडून आवाहन
दरम्यान, जिल्हा सुकाणू समितीमध्ये प्रदेश समितीकडून नियुक्त करण्यात आलेले सुरेश हळवणकर, मकरंद देशपांडे यांच्यासह माजी अध्यक्ष, खासदार विद्यमान व माजी आमदार यांचा समावेश करण्यात आला आहे. तसेच लोकसभा व विधानसभा मतदारसंघ प्रमुख, महिला आघाडी अध्यक्ष, युवा मोर्चा अध्यक्ष यांचा समावेश करण्यात आला आहे.
हेही वाचा…“ज्या काँग्रेसी वृत्तीनं शिवरायांचा पुतळा पाडला, त्या काँग्रेससोबत..,” भाजपची ठाकरेंवर जोरदार टिका
युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिल पाटील, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष प्रकाश गढळे, अल्पसंख्याक मोर्चा आजम मकानदार, महिला मोर्चा उषाताई दशवंत आणि किसान मोर्चाच्या जिल्ह्याध्यक्षपदी राजाराम गरूड आदींची निवड करण्यात आल्याचे पाटील यांनी जाहीर केली आहे. मंडळ अध्यक्ष म्हणून १५ जणांची नियुक्ती करण्यात आली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“किती लोकांचे तोंड दाबतील?” सोमय्यांचा व्हिडीओ दाखवणाऱ्या चॅनेलवर ७२ तासांची बंदी
हेही वाचा…“भाजपाच्या सोबत असाल तर चौकशा, धाडी थांबतात अन् विरोधात बोलाल तर…,” सुप्रिया सुळे भाजपवर कडाडल्या
हेही वाचा…“भाजपसोबत जाण्याचा पहिला आग्रह रोहित पवारांचाच होता,” सुनील शेळकेंचा रोहित पवारांवर आरोप
हेही वाचा…“बंडखोर आमदारांवर नेमकी काय कारवाई होणार ?”ऑनलाईन लाईव्ह दाखवा, वडेट्टीवारांची मागणी
हेही वाचा…“शरद पवार, ठाकरे अन् राहुल गांधींची सभा, जुन्नरमध्ये भाजपवर ‘या’ दिवशी जोरदार हल्लाबोल होणार”