पुणे : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशातील प्रमुख विरोधी पक्षांनी इंडिया आघाडी स्थापन केली आहे. पुढील लोकसभा निवडणुका नरेंद्र मोदींच्या विरोधात एकत्रित लढणार असून इंडिया आघाडीच्या सभा देखील देशभरात एकत्रित होणार आहेत. यातच जुन्नर येथे इंडिया आघाडीची सभा होत असून पक्ष फुटीनंतर शरद पवारांची पहिल्यांदाच जुन्नरमध्ये सभा होत आहे.
हेही वाचा…“महाराष्ट्रात भयंकर दुष्काळ, शेतकऱ्याला कोणी वाली आहे का नाही?”
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. यातच शरद पवारांनी देखील एनडीएसोबत यावं यासाठी प्रयत्न करण्यात आला. परंतु शरद पवार आपल्या भूमिकेवर ठाम राहिलेत. त्यानंतर शरद पवारांच्या सभा अनेक ठिकाणी झाल्यात. यातच आता १ ऑक्टोंबर रोजी जुन्नर येथे शरद पवारांची सभा होत आहे. आदिवासी चौथरा निमित्ताने इंडिया आघाडीतील अनेक नेते याठिकाणी उपस्थित राहणार आहे.
हेही वाचा…“शरद पवार भविष्यात नरेंद्र मोदींसोबत येतील,” बड्या आमदाराने बाप्पाकडे घातलं साकडं
दरम्यान, शरद पवार यांच्यासह काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि खासदार राहुल गांधी, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील जुन्नरच्या सभेला उपस्थित राहणार आहेत. इंडिया आघाडी स्थापन झाल्यानंतर पहिल्यांदाच सभा होत असल्याने या सभेकडे आता सगळ्याचं लक्ष लागून राहिलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“रोहित पवार चार वर्षातच ‘दादा’ होऊ पाहतोय, “आमदार सुनील शेळकेंची रोहित पवारांवर जोरदार टिका
हेही वाचा…“तेव्हा कोणाची उंची किती आहे ते कळेल ?” शिंदे गटाची आदित्य ठाकरेंवर टिका, आता ठाकरे गटाकडून आवाहन
हेही वाचा…“ज्या काँग्रेसी वृत्तीनं शिवरायांचा पुतळा पाडला, त्या काँग्रेससोबत..,” भाजपची ठाकरेंवर जोरदार टिका
हेही वाचा…‘तो’ फोटो का शेअर केला ? कानउघडणी करीत शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना खडसावलं
हेही वाचा…“दादांनी २ कोटींचा निधी तुम्हाला दिलाय, हा फक्त नमुना, यादी मोठी आहे,” अजित पवार गटाचा रोहित पवारांना प्रत्युत्तर