पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या विरोधात बंड पुकारत भाजपसोबत सत्तेत सामील झालेत. बंडानंतर शरद पवारांनी देखील नरेंद्र मोदींच्या एनडीएमध्ये सहभागी व्हावे, यासाठी अजित पवार गटातील नेत्यांनी शरद पवारांची दोन ते तीन वेळा भेट घेतली. परंतु शरद पवार आपल्या भूमिकेवर ठाम राहिलेत. यातच आता शरद पवार भविष्यात मोदीसोबत येतील असा दावा अपक्ष आमदार रवी राणा यांनी केला आहे.
हेही वाचा…ओबीसी आरक्षण उपोषण..! रवींद्र टोंगेंना अतिदक्षता विभागात हलवलं, प्रकृती चिंताजनक
अजित पवार ज्या प्रकारे नरेंद्र मोदी यांचं काम, ध्येय बघून भाजपसोबत आले आहेत. त्याच पद्धतीने शरद पवार देखील महाराष्ट्राच्या हितासाठी, देशाच्या विकासासाठी नरेंद्र मोदी यांच्यासोबत आले पाहिजेत,. यासाठी बाप्पाकडे साकडे घातलं आहे. नक्कीच हा चमत्कार होईल, अन् भविष्यात शरद पवार नरेंद्र मोदी सोबत येतील. अस रवी राणा यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…ठाकरे अन् शिंदे सुनावणीसाठी उपस्थित राहणार, विधानसभा अध्यक्ष नोटीस पाठवणार, सोमवारी सुनावणी
दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये नरेंद्र मोदींचा पराभव करण्यासाठी देशातील प्रमुख विरोधकांनी इंडिया आघाडी स्थापन केली आहे. या इंडिया आघाडीत शरद पवारांचाही समावेश आहे. यातच इंडिया आघाडी खुळखूळी करण्यासाठी भाजपने शरद पवारांना आपल्यासोबत आणण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यात त्यांना यश आलं नाही. यातच आता रवी राणा यांनी मोठं भाकित केलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…ठाकरे गट मध्य प्रदेशात निवडणुका लढविणार का ? आदित्य ठाकरेंनी दिलं उत्तर, म्हणाले,..
हेही वाचा…“लाचारीचा कळस गाठल्यामुळेच आपण..,” अजित पवार गटाचा वडेट्टीवारांना जोरदार प्रत्युत्तर
हेही वाचा…“लोकशाहीचं मंदिर आहे कि भाजपच्या गावगुंडांची शाळा ?” लोकसभेत भाजप खासदाराची दादागिरी
हेही वाचा…“आता कुणाचीही सुटका नाही, 16 अपात्र आमदार प्रकरणाबाबत विधानसभा अध्यक्षांना निर्णय घ्यावाच लागणार”
हेही वाचा…“भाजप ओबीसींना मागे का ढकलत आहे ? “, राहुल गांधींचा भाजपला सवाल