चंद्रपूर : मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी मनोज जरांगे पाटलांनी उपोषण केले. त्यानंतर संपुर्ण राज्यात ओबीसी आरक्षणासाठी उपोषण सुरू झाले आहेत. यातच चंद्रपुरात उपोषणाला बसलेल्या रवींद्र टांगे यांची प्रकृती खालावली आहे. रविंद्र टांगे यांना तातडीने रूग्णालयात दाखल करून उपचार घ्यावे, असा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
हेही वाचा…आणखी एक मनोज जरांगे पाटील..! रवींद्र टांगेंची प्रकृती खालावली, रूग्णालयात दाखल करण्याचा डॉक्टरांचा सल्ला
ओबीसी कार्यकर्ते रवींद्र टोंगे यांची प्रकृती खालावली आहे. रवींद्र टोंगे यांची प्रकृती चिंताजनक झाली असून त्यांना अतिदक्षता कक्षात हलविण्यात आलं आहे. रवींद्र टोंगे यांची प्रकृती बघता वैद्यकीय पथकाने हा निर्णय घेतला आहे. मात्र अतिदक्षता कक्षातही रवींद्र टोंगे यांनी कुठलंही अन्नग्रहण न करण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे आता यावर सरकार काय कारवाई करणार ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा…तारिख ठरली..! ‘या’ दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अपात्र होणार ? राजकीय घडामोडींना वेग
ओबीसी आरक्षणातून मराठा आरक्षण देऊ नये, यासाठी बसलेल्या रवींद्र टांगे याची प्रकृती बिघडली आहे. मागील १२ दिवसापासून चंद्रपुरात ओबीसींच्या आरक्षण मागणीसाठी उपोषण सुरू आहे. यावरून सरकारने तातडीने आपल्या प्रतिनिधींना उपोषण स्थळी पाठवावे व आंदोलन सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावे, अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
हेही वाचा…भाजपने केलेल्या सर्वेक्षणात ‘हा’ मतदारसंघ अडचणीत, उमेदवार बदलण्याच्या हालचाली सुरू, कॅबिनेट मंत्र्यांच्या नावाची चर्चा
दरम्यान,मागील ९ दिवसांपासून रवींद्र टांगे हा तरुण ओबीसींच्या मागण्यांसाठी आमरण उपोषण करतोय. राज्यात ५२% ओबीसी आहे, मात्र सरकारला त्यांच्या मागण्यांचे आणि आंदोलनाचे गांभीर्य नाही. रवींद्र टांगे यांची प्रकृती खालावत असून सरकार ओबीसी आंदोलनाकडे अजूनही दुर्लक्ष करत आहे. सरकारने तातडीने आपल्या प्रतिनिधींना उपोषण स्थळी पाठवावे व आंदोलन सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा ही मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी सांगितले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…ठाकरे अन् शिंदे सुनावणीसाठी उपस्थित राहणार, विधानसभा अध्यक्ष नोटीस पाठवणार, सोमवारी सुनावणी
हेही वाचा…“अजित पवार गटाकडून शरद पवार गटातील आमदार, खासदारांचं ब्लॅकमेलिंग,” रोहित पवारांचा आरोप
हेही वाचा…“सत्तेसाठी लाचारी पत्करणारे अजित पवार पडळकरांना उत्तर देतील, पण..,”, वडेट्टीवारांचा खोचक टोला
हेही वाचा…शिंदे गटातील विधान परिषदेच्या ‘त्या’ तीन आमदारांचं पुढे काय होणार ? ठाकरे गटाकडून हालचाली सुरू
हेही वाचा…राष्ट्रवादीत प्रवेश अन् तात्काळ ‘प्रदेश उपाध्यक्ष’ पदी निवड, उदय कुमार अहेर यांचा राष्ट्रवादीत प्रवेश