मुंबई : शिवसेना आमदार अपात्रतेबाबत अध्यक्षांच्या दिरंगाई कामकाजावरून सुप्रिम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना फटकारत एक आठवड्यात सुनावणी घेण्याचे आदेश दिलेत. त्यानंतर काल तातडीने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर दिल्लीला रवाना झाले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काल दिल्लीत कायदेशीर सल्लामसलत करून पुढची रणनिती ठरवल्याची सुत्रांनी माहिती दिली आहे.
हेही वाचा…सरकारची २६५.५४ कोटींची वसुली, अर्धे उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वसनाचं काय झालं? वडेट्टीवारांचा सवाल
आमदार अपात्रतेबाबत अध्यक्ष दिरंगाई करत असल्याचं सांगत ठाकरे गटाकडून याचिका दाखल करण्यात आली. त्यावर सुनावणी घेत कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना एका आठवड्याची मुदत दिली. त्यावर काल विधानसभा अध्यक्ष दिल्लीला यासंदर्भात चर्चा करण्यासाठी गेल्याची माहिती समोर आली आहे. सुप्रिम कोर्टाच्या आदेशानंतर २५ सप्टेंबरला आमदार आपात्रतेबाबत पुढची सुनावणी विधानसभा अध्यक्ष घेणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
हेही वाचा…एकनाथ शिंदे अपात्र होणार ? राहुल नार्वेकर तातडीने दिल्लीला रवाना, राजकीय हालचालींना वेग
दरम्यान, दिल्लीत कायदेशीर सल्लामसलत करून विधानसभा अध्यक्षांनी रणनीती ठरवली आहे. केवळ अध्यक्ष म्हणून नव्हे तर ट्रिब्युनल म्हणून या केसमध्ये काम करायचं आहे. याची आठवण सुप्रिम कोर्टाने मागच्या सुनावणीत केली होती. त्यामुळे सोमवारच्या सुनावणीत कशा पद्धतीने कार्यवाही होते आणि पुढची तारीख विधानसभा अध्यक्ष काय देतात याची उत्सुकता आता सगळ्यांना लागून राहिली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…भाजपने केलेल्या सर्वेक्षणात ‘हा’ मतदारसंघ अडचणीत, उमेदवार बदलण्याच्या हालचाली सुरू, कॅबिनेट मंत्र्यांच्या नावाची चर्चा
हेही वाचा…पुण्यातील आठही विधानसभा मतदारसंघावर कमळ फुलणार, भाजपची रणनीति ठरली
हेही वाचा…शिंदेंच्या बाल्लेकिल्यात ‘आदित्य ठाकरे’ निवडणुक लढविणार, लोकसभेसाठी तयारी सुरू
हेही वाचा…“महिला आरक्षण हा केवळ निवडणुकीतील ‘जुमला”, सुप्रिया सुळेंचा मोदींवर हल्लाबोल
हेही वाचा…पडळकरांची चुकी, तरी बावनकुळेंनी मागितली माफी, परंतु पडळकर ‘त्या’ वक्तव्यावर ठाम