यवतमाळ : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने लोकसभेच्या ४८ जागापैकी ४५ जागा जिंकण्याचं लक्ष ठेवलं आहे. यासाठी कमकुवत मतदारसंघाचा अभ्यास करण्यात आला आहे. यातच महायुतीतील यवतमाळ वाशीम लोकसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार आगामी लोकसभा निवडणुकीत पडण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे सध्या या मतदारसंघावरून भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत शाब्दिक चकमक झाली आहे.
हेही वाचा…एकनाथ शिंदे अपात्र होणार ? राहुल नार्वेकर तातडीने दिल्लीला रवाना, राजकीय हालचालींना वेग
सध्या यवतमाळ वाशीम लोकसभा मतदारसंघात शिवसेनेच्या भावना गवळी खासदार आहेत. महाविकास आघाडी सरकार असताना भाजपच्याच नेत्यांनी भावना गवळी यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आले आहेत. श्री बालाजी पार्टीकर बोर्ड कारखान्याबाबत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. तसेच मागील काही वर्षापासून भावना गवळींचा प्रभाव देखील कमी झाला आहे. त्यातच भाजपने घेतलेल्या सर्वेक्षणात यवतमाळ वाशीम लोकसभा मतदारसंघ अडचणीत ठरत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
हेही वाचा…“शासनामार्फत निधी उपलब्ध करून देण्यात येईल, आराखडा तयार करा,” अजितदादांचा पुण्यासाठी मोठा निर्णय
भावना गवळ यांच्या जागेवर महाराष्ट्राचे वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनवर्सन विभागाचे कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांना या जागेसाठी भाजपकडून ऑफर देण्यात आल्याचं समजत आहेत. शिवसेना पक्षाच्या तिकीटावर दिग्रस विधानसभा मतदारसंघातून ते आमदार आहेत. तसेच सध्या संजय राठोड यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री देखील आहेत. यातच यवतमाळ वाशिम लोकसभा जिंकायची असेल तर संजय राठोड यांना उमेदवारी द्या, असा छुपा सर्व्हे भाजप पुढे आला आहे. तसा संदेश देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला असल्याची सुत्रांनी माहिती दिली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…पुण्यातील आठही विधानसभा मतदारसंघावर कमळ फुलणार, भाजपची रणनीति ठरली
हेही वाचा…शिंदेंच्या बाल्लेकिल्यात ‘आदित्य ठाकरे’ निवडणुक लढविणार, लोकसभेसाठी तयारी सुरू
हेही वाचा…“महिला आरक्षण हा केवळ निवडणुकीतील ‘जुमला”, सुप्रिया सुळेंचा मोदींवर हल्लाबोल
हेही वाचा…पडळकरांची चुकी, तरी बावनकुळेंनी मागितली माफी, परंतु पडळकर ‘त्या’ वक्तव्यावर ठाम
हेही वाचा…सरकारची २६५.५४ कोटींची वसुली, अर्धे उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वसनाचं काय झालं? वडेट्टीवारांचा सवाल