नवी दिल्ली : मोदी सरकारच म्हणतं की, ‘सबका साथ, सबका विकास’. त्यामुळे आता त्यांनी प्रयत्न करावेत आणि सर्वांना बरोबर घ्यावं. महिला आरक्षणात प्रत्येकाचं योगदान आहे. रस्त्यावर संघर्ष करणाऱ्या महिलांना महिला आरक्षणामुळे निवडून येण्याची संधी मिळेल का? यावर सविस्तरपणे चर्चा झाली पाहिजे. अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
हेही वाचा…“आरोग्य मंत्र्यांच्या स्वःताच्या मतदासंघातच आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजले “, राष्ट्रवादीची जोरदार टिका
महिला आरक्षण विधेयकावर काल लोकसभेत चर्चा करण्यात आली. त्यावर सुप्रिया सुळे यांनी देखील सहभाग घेत महिला आरक्षणाबाबत आपली भुमिका मांडली. २०२९ च्या आधी महिला आरक्षणाची अंमलबजावणी अशक्य आहे. कारण अद्याप पुनर्रचना होणं बाकी आहे. हा केवळ निवडणुकीतील ‘जुमला’ आहे. महिला आरक्षणाला आमचा पक्ष पूर्ण ताकदीने पाठिंबा देत आहे. यात ओबीसींनाही आरक्षण असायला हवं. आरक्षण सर्वसमावेशक असावं. इतरांना मागे टाकून पुढे जाण्यात काहीच अर्थ नाही. सर्वांना बरोबर घेऊन जाण्यात आनंद असतो. अस सुप्रिया सुळे म्हणाल्या.
हेही वाचा…अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपविधीला, मोदी, शरद पवार, ठाकरे, फडणवीस, पुण्यात साकारला अनोखा देखावा
दरम्यान, “पुनर्रचनेचं काय होणार?, जनगणनेचं काय होणार? हे समजेल तेव्हाच याबाबत स्पष्टता येईल. केवळ वर्तमान पत्राच्या ‘हेडलाईन’वरून (मथळा) संपूर्ण वर्तमानपत्र वाचता येत नाही.” असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
READ ALSO :
हेही वाचा…पडळकरांची चुकी, तरी बावनकुळेंनी मागितली माफी, परंतु पडळकर ‘त्या’ वक्तव्यावर ठाम
हेही वाचा…सरकारची २६५.५४ कोटींची वसुली, अर्धे उपमुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वसनाचं काय झालं? वडेट्टीवारांचा सवाल
हेही वाचा…एकनाथ शिंदे अपात्र होणार ? राहुल नार्वेकर तातडीने दिल्लीला रवाना, राजकीय हालचालींना वेग
हेही वाचा…“शासनामार्फत निधी उपलब्ध करून देण्यात येईल, आराखडा तयार करा,” अजितदादांचा पुण्यासाठी मोठा निर्णय
हेही वाचा…“त्याच व्यक्तीवर सूडबुद्धीने आरोप करणारी व्यक्ती..,” पहिल्यांदाच रूपाली चाकणकरांची सुळेंवर अप्रत्यक्ष टिका