पुणे : लोकसभेतल्या सलग दुसऱ्या भाषणात सुप्रिया सुळे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दिशेने अप्रत्यक्ष हल्लाबोल केला आहे. “प्रत्येक घरात असे भाऊ असतातच, असे नाही की जे बहिणीचं कल्याण बघतील. प्रत्येकाचं नशीब एवढं चांगलं नसतं”. असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं. तसेच सिंचन आणि बॅंक घोटाळ्याची चौकशी करण्याचीही मागणी सुप्रिया सुळे यांनी मोदींकडे केली आहे. यावरून राष्ट्रवादीत आता कुटूंबात देखील कटुता वाढत असल्याचं दिसून येत आहे. यावरून आता अजित पवार गटातील नेत्या आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी सुळेंवर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.
हेही वाचा…लोकसभा मिशन 45 साठी भाजपचे शिलेदार कोण? मंत्रीपद विसरून तयारीला लागा, भाजपच्या वरिष्ठांचे आदेश
राष्ट्रवादीने केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करा म्हणून गेल्या एक-दीड महिन्यांमध्येच वाढत असलेली काही आत्मविश्वास गमावलेल्या लोकांची मागणी पाहून आश्चर्य वाटतं. मुळात हा प्रकार म्हणजे कोणत्याही भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध न होऊन देखील पुन्हा पुन्हा शिळ्या कडीला ऊत आणण्यासारखे आहे. बरं आम्ही कोणाला खरं समजायचं?? कुणाच्या आठवणीने उमाळा दाटून येणारी व्यक्ती खरी की, त्याच व्यक्तीवर सूडबुद्धीने आरोप करणारी व्यक्ती खरी?? असा खोचक सवालही त्यांनी केला आहे.
हेही वाचा…महाराष्ट्रात दुष्काळाच्या तीव्र झळा, तब्बल ‘इतक्या’ शेतकऱ्यांनी संपवलं आयुष्य, आकडा ऐकून थक्क व्हाल
दरम्यान, केंद्र सरकारने मंगळवारी संसदेत महिला आरक्षण विधेयक सादर केलं. यातच गणेश चतुर्थीच्या शुभ महुर्तावर लोकसभेचं कामकाज नव्या संसेदत सुरू झालं आहे. यावेळी लोकसभेच्या विशेष अधिवेशनात महिला आरक्षणावर चर्चा होत आहेत. या चर्चांमध्ये राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील सहभाग घेतला. यातच दोन दिवस सलग सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या दिशेने अप्रत्यक्ष हल्लाबोल केला आहे.
राष्ट्रवादीने केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करा म्हणून गेल्या एक-दीड महिन्यांमध्येच वाढत असलेली काही आत्मविश्वास गमावलेल्या लोकांची मागणी पाहून आश्चर्य वाटतं. मुळात हा प्रकार म्हणजे कोणत्याही भ्रष्टाचाराचे आरोप सिद्ध न होऊन देखील पुन्हा पुन्हा शिळ्या कडीला ऊत आणण्यासारखे आहे 1/2
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) September 19, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“आरोग्य मंत्र्यांच्या स्वःताच्या मतदासंघातच आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजले “, राष्ट्रवादीची जोरदार टिका
हेही वाचा…अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपविधीला, मोदी, शरद पवार, ठाकरे, फडणवीस, पुण्यात साकारला अनोखा देखावा
हेही वाचा…धनगर आरक्षणासंदर्भात मुंबईत बैठक, “मंगळसुत्र”चोराला दुर ठेवा, राष्ट्रवादीचा पडळकरांना अप्रत्यक्ष टोला
हेही वाचा…शिंदे गटातील माजी आमदार शरद सोनवणे २९ सप्टेंबर रोजी ‘मोठी’ घोषणा करणार, चर्चांना उधाण
हेही वाचा…एकनाथ शिंदे अपात्र ठरल्यास अजित पवारांना मुख्यमंत्री करणार, ? भाजपचा पुढचा प्लॅन तयार, गडकरींचंही नाव चर्चेत