मुंबई : मराठा आरक्षणानंतर आता धनगर आरक्षणाचा मुद्दा राज्यात मोठ्या प्रमाणात गाजत आहेत. अनेक ठिकाणी धनगर समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी आंदोलन, उपोषण केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळाची सह्याद्री अतिथी गृहावर धनगर समाज आरक्षणासंदर्भात महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीसाठी अभ्यासू नेत्यांना बोलवण्यात यावे, मंगळसूत्र चोर दुर ठेवावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलीय.
हेही वाचा…“मुख्यमंत्र्यांसह १६ आमदारांची राजकीय तिरडी बांधलीय, आता फक्त..,” खासदाराचा मोठा दावा
राज्यात मागील काही दिवसापासून विविध समाजासाठी आरक्षणावरून राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने एक महिन्याची मुदत दिली आहे. तर दुसऱ्या बाजूला आरक्षणासाठी धनगर समाज देखील आक्रमक झाला आहे. याचसंदर्भात आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक पार पडणार आहे.
हेही वाचा…“बहुजन समाजाने खडबडून जागं व्हावं..,”आव्हाडांचं आवाहन, केंद्र सरकारच्या ९० सचिवांपैकी फक्त ३ च ओबीसी
दरम्यान, धनगर समाज आरक्षणासंदर्भात सह्याद्री अतिथी गृहावर महत्त्वाची बैठक संपन्न होणार आहे. सरकार याबाबत सकारात्मक विचार करून न्याय देईल ही अपेक्षा. बैठकीमध्ये समाजातील अभ्यासु नेते राम शिंदेजी, महादेवराव जानकर आदी लोकांना बोलवावे. समाजाच्या जीवावर उड्या मारणारे “मंगळसुत्र”चोर दुर ठेवावे. असा खोचक टोला मिटकरी यांनी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना लगावला आहे.
धनगर समाज आरक्षणासंदर्भात सह्याद्री अतिथी गृहावर महत्त्वाची बैठक संपन्न होणार आहे. सरकार याबाबत सकारात्मक विचार करून न्याय देईल ही अपेक्षा. बैठकीमध्ये समाजातील अभ्यासु नेते राम शिंदेजी,महादेवराव जानकर आदी लोकांना बोलवावे.समाजाच्या जीवावर उड्या मारणारे “मंगळसुत्र”चोर दुर ठेवावे
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) September 21, 2023
READ ALSO :
हेही वाचा…शिंदे गटातील माजी आमदार शरद सोनवणे २९ सप्टेंबर रोजी ‘मोठी’ घोषणा करणार, चर्चांना उधाण
हेही वाचा…एकनाथ शिंदे अपात्र ठरल्यास अजित पवारांना मुख्यमंत्री करणार, ? भाजपचा पुढचा प्लॅन तयार, गडकरींचंही नाव चर्चेत
हेही वाचा…लोकसभा मिशन 45 साठी भाजपचे शिलेदार कोण? मंत्रीपद विसरून तयारीला लागा, भाजपच्या वरिष्ठांचे आदेश
हेही वाचा…महाराष्ट्रात दुष्काळाच्या तीव्र झळा, तब्बल ‘इतक्या’ शेतकऱ्यांनी संपवलं आयुष्य, आकडा ऐकून थक्क व्हाल
हेही वाचा…“राज्यसभेत महिला आरक्षण विधेयक मंजूर होणार , 27 वर्षाची प्रतिक्षा संपुष्टात येणार का ?”