नवी दिल्ली : लोकसभेत बुधवारी सांयकाळी सात वाजता महिला आरक्षण विधेयकावर मतदान घेण्यात आलं. यावेळी लोकसभेतील ४५४ सदस्यांनी विधेयकाच्या बाजूने मतदान केलं. तर फक्त दोन खासदारांनी या आरक्षण विधेयकाच्या विरोधात मतदान करत महिला आरक्षण विधेयक लोकसभेत प्रचंड बहुमतांनी मंजूर झालं आहे. आज राज्यसभेत विधेयक मांडलं जाणार असून याकडे आता लक्ष लागून राहिलं आहे.
हेही वाचा…“तर नारायण राणेंना कोंबडीचोर म्हणणं ही..,” अजित पवार गटातील नेत्याचं राणेंना जोरदार प्रत्युत्तर
महिला आरक्षण विधेयकाच्या मतदानावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील लोकसभेत उपस्थित होते. दरम्यान, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी हे विधेयक लोकसभेत पारित करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. तर आज राज्यसभेत आज महिला आरक्षण विधेयक मंजूरीसाठी मांडलं जाणार असून या विधेयकावर चर्चा करण्यासाठी साडे सात तास देण्यात आले आहेत. सर्वच राजकीय पक्षाचे प्रमुख नेते या विधेयकावर बोलतील. त्यानंतर मतदान होणार आहे. यातच आता राज्यसभेत महिला आरक्षण विधेयक मंजूर होणार का ? 27 वर्षाची प्रतिक्षा संपुष्टात येणार का ? याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.
हेही वाचा…हे विधान टाळतं आलं असतं, पण.., वैफल्यग्रस्त भूमिकेतून, अजित पवार गटाचा सुळेंना टोला
दरम्यान, महिला आरक्षण दोन्ही सभागृहात मंजूर झाल्यानंतर महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळणार आहे. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत महिलांना ३३ टक्के आरक्षण मिळल्यानंतर महिला लोकप्रतिनिधींची संख्या वाढणार आहे. यातच आता राज्यात लोकसभेच्या ४८ खासदारांपैकी ८ खासदार असून त्यांची संख्या आता १६ वर जाणार आहे. तर संपुर्ण देशात तीच संख्या १८१ वर जाणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“मुख्यमंत्र्यांसह १६ आमदारांची राजकीय तिरडी बांधलीय, आता फक्त..,” खासदाराचा मोठा दावा
हेही वाचा…“बहुजन समाजाने खडबडून जागं व्हावं..,”आव्हाडांचं आवाहन, केंद्र सरकारच्या ९० सचिवांपैकी फक्त ३ च ओबीसी
हेही वाचा…“तर पिंपरी-चिंचवड, मावळ मतदारसंघात महिलाराज येईल,” राजकीय गणितं काय सांगतात ?
हेही वाचा…लोकसभेतल्या सलग दुसऱ्या भाषणात सुळेंचा अजित पवारांवर हल्लाबोल, राष्ट्रवादीत वाद वाढत चाललंय का ?
“समज देऊनही ऐकले नाही तर देवेंद्र फडणवीसांनी पडळकरांना पक्षातून काढून टाकावे”, राष्ट्रवादीची मागणी