मुंबई : संसदेच्या विशेष अधिवेशनात खासदार सुप्रिया सुळे यांनी सिंचन घोटाळा आणि बॅंक घोटाळ्याबाबत चौकशी करण्याची मागणी केली आहे. अलिकडेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचे आरोप लावले होते. त्यानंतर दोनच आठवड्यात अजित पवारांनी भाजपसोबत सरकार स्थापन केलं. यावर आता अजित पवार गटातील खासदार सुनील तटकरे यांनी सुळेंना टोला लगावला आहे.
हेही वाचा…“नुसत्याच बाजार गप्पा मारून लोकांचा दिशाभ्रम करण्यात आजोबा आणि नातू पटाईत”,भाजपचा रोहित पवारांना खोचक टोला
अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली आम्ही घेतलेल्या निर्णयामुळे सुप्रिया सुळे यांना आलेलं नैराश्य अद्यापही दूर झालेलं दिसत नाही. याबाबत चौकशी पूर्ण झाली असून न्यायालयाचे निर्णयही झाले आहेत. वैफल्यग्रस्त भूमिकेतून अशाप्रकारची वक्तव्य येतात. हे विधान टाळता आलं असतं. असं सुनील तटकरे यांनी केलं आहे.
हेही वाचा…“श्रेय लाटण्यासाठी गुळाला मुंग्या चिकटाव्या तशा..,” सुळेंच्या ‘त्या’ वक्तव्याला भाजपचं जोरदार प्रत्युत्तर
दरम्यान, प्रत्येक वृत्तपत्राने महिला आरक्षणाच्या विधेयकांचं कौतूक केलं आहे. पण सोबतच त्यांनी कॅनडा येथील प्रकरणाचीही बातमी छापली आहे. त्यावरही चर्चा झाली पाहिजे. महाराष्ट्रात मराठा, धनगरस लिंगायत आणि मुस्लिम आरक्षणांचा विषय प्रलंबित आहे. त्याचीही चर्चा झाली पाहिजे. गृहमंत्री अमित शाह यांनी आज एका वक्त्याला दुरूस्त करताना महिलांच्या भल्याचा विचार भाऊ का करू शकत नाही, असं विधान केलं. त्यांनी म्हटलं ते खरचं आहे. पण बहिणीचा कल्याण करणारे भाऊ प्रत्येक घरात नसतात. प्रत्येकांचं नशीब इतकं चांगलं नसतं. असं विधान सुप्रिया सुळेंनी म्हटलंय.
READ ALSO :
हेही वाचा…शरद पवारांच्या राष्ट्रवादीत अनेकांच्या नियुक्त्या, अनेक नव्या चेहऱ्यांना संधी
हेही वाचा…“शरद पवारांनी जाहीरपणे सांगितलंय, कुणी गल्लत करू नये,” ‘त्या’ फोटोवरून अजित पवार गटाची प्रतिक्रिया
“बहिणीचा कल्याण करणारे भाऊ प्रत्येक घरात नसतात”, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
हेही वाचा…महिला आरक्षणामुळे पुणे अन् पिंपरी चिंचवडचा प्रस्थापित गड ढासळणार? रणरागिनींना ‘ॲपोर्च्युनिटी’ : ३३ टक्के आरक्षणाचा फायदा होणार
हेही वाचा…“प्रफुल्ल पटेल कोणत्या पक्षात आहेत ?” शरद पवारांसोबत प्रफुल्ल पटेलांचा फोटो चर्चेत