मुंबई : संसदेच्या नव्या इमारतीत लोकसभेच्या पहिल्या दिवसाच्या कामकाजाला सुरूवात झाली आहे. यातच काल संसदेत महिला आरक्षण विधेयक मांडण्यात आलं. यावेळी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार गटाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल एकत्र आल्याचं दिसून आलं. त्यांनी याचे फोटो काल ट्विटवर देखील शेअर केलेत. यात एका फोटोत खासदार वंदना चव्हाण देखील दिसत आहेत. यावरून राज्यातील राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झालीय. याच पार्श्वभूमीवर खासदार वंदना चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
हेही वाचा…“मोदींकडून कोट्यवधी महिलांचा भ्रमनिराश, २०२४ च्या निवडणुकीत महिला आरक्षण लागू होणार नाही”
आपल्याला माहीत आहे की, शरद पवार हे संकोचित मनोवृत्तीचे नाहीत. त्यांचा विचार खूप व्यापक आणि मोठा आहे. उद्या कदाचित नरेंद्र मोदी त्यांच्यासमोर आले तर ते त्यांच्याशीही व्यवस्थित बोलतील. वैयक्तिक संबंध वेगळे असतात. कुणी आपल्या शेजारी येऊन बसलं तर त्याला उठून जा किंवा आम्ही उठून जातो, असं शरद पवार कदापि म्हणणार नाहीत. असं कुणीच करू नये. राजकीयदृष्ट्या आम्ही वेगळे आहोत, हे शरद पवारांनी जाहीरपणे सांगितलं आहे. त्यामुळे कुणी गल्लत करू नये. असं वंदना चव्हाण यांनी म्हटलंय.
हेही वाचा…ठाकरेंचा आणखी एक हुकमी एक्का अडचणीत, खिचडी घोटाळा प्रकरणात ‘या’ नेत्याची चौकशी होणार
दरम्यान, शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल भेटीमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. यावर प्रश्नाचं उत्तर देतांना राऊत म्हणाले की, त्यांच्या कार्यकर्त्यांमधील संभ्रम त्यांनी पाहावा. यामुळे महाविकास आघाडीमध्ये कोणतीही फूट पडणार नाही. प्रफुल्ल पटेल कोणत्या पक्षात आहेत ? हे मला माहिती नाही. पण शरद पवार राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचे अध्यक्ष आहेत. शरद पवारांनी फुटीर गटाविरूद्ध निवडणुक आयोग आणि न्यायालयात खटला दाखल केला असून फुटीर आमदारांना अपात्र करण्यासाठी याचिकाही केली असल्याचं राऊत म्हणाले.
An electrifying day at the new Parliament House! The Rajya Sabha Chamber is a marvel, and sharing this moment with Hon’ble Sharad Pawar Saheb makes it even more special. And now, savoring some snacks and camaraderie with friends in the cafeteria – truly a day to remember! 🇮🇳… pic.twitter.com/Z1J105wHn9
— Praful Patel (@praful_patel) September 19, 2023
READ ALSO :
“बहिणीचा कल्याण करणारे भाऊ प्रत्येक घरात नसतात”, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य
हेही वाचा…महिला आरक्षणामुळे पुणे अन् पिंपरी चिंचवडचा प्रस्थापित गड ढासळणार? रणरागिनींना ‘ॲपोर्च्युनिटी’ : ३३ टक्के आरक्षणाचा फायदा होणार
हेही वाचा…“प्रफुल्ल पटेल कोणत्या पक्षात आहेत ?” शरद पवारांसोबत प्रफुल्ल पटेलांचा फोटो चर्चेत
हेही वाचा…“नुसत्याच बाजार गप्पा मारून लोकांचा दिशाभ्रम करण्यात आजोबा आणि नातू पटाईत”,भाजपचा रोहित पवारांना खोचक टोला
हेही वाचा…“श्रेय लाटण्यासाठी गुळाला मुंग्या चिकटाव्या तशा..,” सुळेंच्या ‘त्या’ वक्तव्याला भाजपचं जोरदार प्रत्युत्तर