मुंबई : मुंबई महानगरपालिकेतील कथित खिचडी घोटाळा प्रकरणात मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे. मुंबई महापालिकेचया कथित डेड बॉडी प्रकरणानंतर आता खिचडी घोटाळ्यातली आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणात आता ठाकरे गटातील आणखी एका नेत्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा…“डुकरांची पिल्ले आणून पडळकरांचा निषेध,” अजित पवारांवरील टिका चांगलीच पडळकरांना भोवली
आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हे शाखेने संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजीत पाटकर, सुनील बाळा कदम, महापालिकेचे तत्कालीन सहा. आयुक्त, नियोजन, बीएमसी अधिकारी, सह्याद्री रिफ्रेशमेंटचे राजीव साळूंखे, फोर्सवन मल्टी सर्विसेसचे भागीदार आणि कर्मचारी, स्नेहा कॅटरर्सटेचे भागीदार, इतर बीएमसी अधिकारी आणि इतर संबंधित खासगी लोकांविरोधात हा गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा…“३२ वर्षापासून भाजपसाठी त्याग करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची फरफट,” कोल्हापूरात भाजपमध्ये अंतर्गत वाद चव्हाट्यावर
तर कथित बॉडी बॅग घोटाळा प्रकरणी आधीपासूनच ठाकरे गटाच्या काही नेत्यांची चौकशी करण्यात आली होती. त्यामध्ये काही जणांवर कारवाई करण्यात आली होती. अशातच आता खिचडी घोटाळ्यात ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेले खासदार गजानन किर्तीकर यांचे सुपूत्र अमोल किर्तीकरांची चौकशी केली जाणार आहे. या प्रकरणात आता याआधी अनेकांची चौकशी झाली असून यात आता ठाकरेंचा आणखी एका हुकमी एक्कांची चौकशी होत असल्याने ठाकरे गटात अस्वस्थता पसरली आहे.
हेही वाचा…“महिला आरक्षण सारख्या पवित्र कामासाठी देवाने मला निवडले”, मोदींच्या वक्त्यावरून सभागृहात गोंधळ
दरम्यान, मुंबई आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्यांनी देखील ट्टिटच्या माध्यमातून ठाकरेंवर निशाणा साधलाय. मुंबई महापालिका कोविड लॉकडाऊन १३२ कोटींचा खिचडी घोटाळा झाला आहे. गरीब कामगारांची खिचडी कोणी खाल्ली ? खिचडीचे पैसे संजय राऊतांचे भाऊ संदिप आणि मुलीचा खात्यात गेले. आदित्य ठाकरेंचे सहयोगी सुरज चव्हाणांच्या खात्यात गेले! सुजित पाटकर, राजिव साळुंखे, बाळा कदम चा खात्यात कोट्यवधी रुपये गेले. असा आरोप त्यांनी केलाय.
READ ALSO :
हेही वाचा…“शरद पवार हा ब्रॅंड, नाव बदललं तरी इतिहास आणि कर्तृत्व तेच राहतं”
हेही वाचा…“पडळकरांच्या तोंडाला काळं फासा अन् एक लाख मिळवा,” राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्यांने केलं आवाहन
हेही वाचा…“तर तु पाटीभर शेण खाणार का ?” राणेंची पडळकरांची पाठराखण, मिटकरींचा नितेश राणेंना टोला
हेही वाचा…“लोकसभेच्या निवडणुका २०२४ नाही तर २०२६ ला होणार, केंद्र सरकारचा मोठा प्लॅन”
हेही वाचा…शिवसेना पक्ष आणि धनुष्याबाण चिन्ह नेमकं कुणाचं? कोर्टात ‘या’ तारखेला होणार फैसला