मुंबई : राष्ट्रवादीच्या पक्ष फुटीचं प्रकरण आता निवडणुक आयोगात गेलं असलं तरी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील नेते एकमेकांना भेटत आहेत. यातच काल संसदेत अजित पवार गटातील नेते आणि राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी शरद पवारांची भेट घेतली. त्यानंतर राज्यात एकच चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…“३२ वर्षापासून भाजपसाठी त्याग करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची फरफट,” कोल्हापूरात भाजपमध्ये अंतर्गत वाद चव्हाट्यावर
प्रफुल्ल पटेल यांच्या मनात काय आहे माहित नाही. मात्र त्यांना ग्राऊंड परिस्थिती लक्षात आली असावी. त्यामुळे त्यांनी कसं वक्तव्य केलं का ? हे माहित नाही. मात्र शरद पवारांनी भूमिका जाहीर व्यासपीठावरून स्पष्ट केली आहे. शरद पवार हा ब्रॅंड आहे. नाव बदललं तरी इतिहास आणि कर्तृत्व तेच राहतं, असं म्हणत केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सुनावणीवर खासदार अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिलीय.
हेही वाचा…“महिला आरक्षण सारख्या पवित्र कामासाठी देवाने मला निवडले”, मोदींच्या वक्त्यावरून सभागृहात गोंधळ
दरम्यान, राष्ट्रवादीच्या पक्ष फुटीनंतर आता हे प्रकरण निवडणुक आयोगात गेलं आहे. राष्ट्रवादी पक्षनाव आणि पक्षचिन्हांबाबत दोन्ही गटाने निवडणूक आयोगात याचिका दाखल केल्या आहेत. याची सुनावणी येत्या ६ ऑक्टोंबर रोजी होणार आहे. त्यामुळे याप्रकरणाबाबत निवडणुक आयोग काय निर्णय देणार ? त्याकडे सर्वांनाचं लक्ष लागून राहिलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“पडळकरांच्या तोंडाला काळं फासा अन् एक लाख मिळवा,” राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्यांने केलं आवाहन
हेही वाचा…“तर तु पाटीभर शेण खाणार का ?” राणेंची पडळकरांची पाठराखण, मिटकरींचा नितेश राणेंना टोला
हेही वाचा…“लोकसभेच्या निवडणुका २०२४ नाही तर २०२६ ला होणार, केंद्र सरकारचा मोठा प्लॅन”
हेही वाचा…शिवसेना पक्ष आणि धनुष्याबाण चिन्ह नेमकं कुणाचं? कोर्टात ‘या’ तारखेला होणार फैसला
हेही वाचा…“डुकरांची पिल्ले आणून पडळकरांचा निषेध,” अजित पवारांवरील टिका चांगलीच पडळकरांना भोवली