पुणे : राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी जहरी टिका केली. त्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून ठिकठिकाणी गोपीचंद पडळकरांच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला. तर काल भाजप आमदार नितेश राणे यांनी गोपीचंद पडळकर यांची पाठराखण केली. यावरून आता राष्ट्रवादीचे नेते आक्रमक झाले आहेत.
हेही वाचा…“महिला आरक्षण सारख्या पवित्र कामासाठी देवाने मला निवडले”, मोदींच्या वक्त्यावरून सभागृहात गोंधळ
गोपीचंद पडळकर कुठेही दिसले तर त्यांना जोड्याने मारा, त्यांच्या तोंडाला काळं फासा अन् एक लाख रूपये नागपूरला येऊन घेऊन जा. असं नागपूरचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत पवार यांनी म्हटलं आहे. तसेच पडळकर नागपुरला आला तर त्यांना आम्ही सोडणार नाही. त्यामुळे त्यांना आमचं आवाहन आहे की, त्यांनी नागपुरला येऊ नये. जर आल्यास त्यांना सोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही. असा इशाराही त्यांनी दिलाय.
हेही वाचा…“जुने संसद भवन आता संविधान भवन”, लोकसभेच्या कामकाजाला नवीन संसद भवनात सुरुवात
महाविकास आघाडीत अजित दादांवर उठसूट टिका करणारे आणि सामनात अग्रलेख लिहिणारे कसे चालतात ? संजय राऊतांना अजित दादांवर बोलायला कोणाचा आशीर्वाद होता ? संजय राऊतांना वेगळा न्याय आणि गोपीचंद पडळकरांना वेगळा न्याय का ? संजय राऊतला मुकसंमती होती काय ? असं ट्विट नितेश राणे यांनी केलं आहे.
हेही वाचा…पडळकरांवर फडणवीसांनी लवकर उपचार करावे, अन्यथा…, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांनी दिला कडक इशारा
दरम्यान, नितेश राणे यांनी केलेल्या ट्विटवर अमोल मिटकरी यांनी उत्तर दिलंय. कोकणातील एका आमदाराच्या लॉजिक बद्दल प्रश्न विचारावा वाटतो की बाबारे एखाद्याने वाटीभर शेण खाल्लं असेल तर तु पाटीभर खाणार का ? अजित पवार केवळ राष्ट्रवादी पक्षाचेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राचा मानबिंदू आहेत. गोप्याच्या सडकछाप भाषेचा केविलवाणा बचाव करण्यासाठी होता. असा घणाघात अमोल मिटकरी यांनी केलाय.
READ ALSO :
हेही वाचा…“तर तु पाटीभर शेण खाणार का ?” राणेंची पडळकरांची पाठराखण, मिटकरींचा नितेश राणेंना टोला
हेही वाचा…“लोकसभेच्या निवडणुका २०२४ नाही तर २०२६ ला होणार, केंद्र सरकारचा मोठा प्लॅन”
हेही वाचा…शिवसेना पक्ष आणि धनुष्याबाण चिन्ह नेमकं कुणाचं? कोर्टात ‘या’ तारखेला होणार फैसला
हेही वाचा…“डुकरांची पिल्ले आणून पडळकरांचा निषेध,” अजित पवारांवरील टिका चांगलीच पडळकरांना भोवली
हेही वाचा…“३२ वर्षापासून भाजपसाठी त्याग करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची फरफट,” कोल्हापूरात भाजपमध्ये अंतर्गत वाद चव्हाट्यावर