सोलापूर : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेतली आहे. लबाड लांडग्यांची पोरं असा उल्लेख केल्याने गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात आज सोलापूरात अजित पवार गटातील कार्यकर्त्यांनी आंदोलन करत पडळकरांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला आहे. यामुळे आज सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे.
हेही वाचा…महिलांना ३३ टक्के आरक्षण, मग हाच न्याय मराठ्यांना का नाही? अशोक चव्हाणांचा सरकारला सवाल
सोलापूर शहरातील भैय्या चौक या ठिकाणी मंगळवारी सकाळी गोपीचंद पडळकरांचं निषेध केला. यावेळी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने डुकरांची पिल्ले आणून त्यांचं नामकरण करत गोपीचंद पडळकरांचा निषेध व्यक्त केला. तसेच पडळकरांच्या विरोधात अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी दिली.
हेही वाचा…१६ आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात विधानसभा अध्यक्षांना अहवाल द्यावा लागणार, आतापर्यंत काय कारवाई झाली ?
दरम्यान, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून टिका केल्यानंतर गोपीचंद पडळकर यांच्याकडून आपली भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. माझ्या समाजाचा विषय आल्यास मी समाजाच्या बाजूने ठामपणे उभा आहे. अजित पवारांबद्दल बोलायचा किंवा त्यांच्यावर टिका करायचा विषय नव्हता. परंतु, तुमच्यासारख्या एका पत्रकारने प्रश्न विचारला. तुम्ही अजित पवारांना पत्र दिलं नाही का ? म्हणून ते उत्तर दिलं. कारण, त्यांना पत्र देऊन काही उपयोगच नाही. असं पडळकर म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…“३२ वर्षापासून भाजपसाठी त्याग करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची फरफट,” कोल्हापूरात भाजपमध्ये अंतर्गत वाद चव्हाट्यावर
हेही वाचा…“महिला आरक्षण सारख्या पवित्र कामासाठी देवाने मला निवडले”, मोदींच्या वक्त्यावरून सभागृहात गोंधळ
हेही वाचा…“जुने संसद भवन आता संविधान भवन”, लोकसभेच्या कामकाजाला नवीन संसद भवनात सुरुवात
हेही वाचा…पडळकरांवर फडणवीसांनी लवकर उपचार करावे, अन्यथा…, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांनी दिला कडक इशारा
हेही वाचा…सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांच्या यादीत ठाकरे की फडणवीस ? ट्विटरवर रंगली ठाकरे गट आणि भाजपमध्ये स्पर्धा